बेमुरव्वत - नितिन पासलकर Bemuravvat by Nitin palaskar
आज आरश्यासमोर तो बराच वेळ उभा राहून केसांची- कंगव्याचा नांगर फिरवून मशागत करत होता. सोबत ग्रामोफोनवरती मुकेशच 'आनंद' चित्रपटातील ' मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने...' वाजत होत, त्याबरोबर शिळ घालत, साथ देत तो गुणगुणत होता. हातात गुलाब घेत गाण गुणगुणत घरातल्या पेंटिंग्जसमोर शिळ घालत हलकेच नाचत होता. देव आनंदची टोपी आणि खांद्यावर मफरल असलेला 'तो' आरशात पाहून स्वत शीच बडबडत होता. आरशासमोर गुलाब धरून स्वतःच स्वतःला प्रपोज करत होता. खिशातून सिगारेट काढून पेटवल्यानंतरचा धुर त्याला उडणार्या फुलपाखरासारखा भासत होता.
लेनिन...तो स्वतः एक चित्रकार होता. एकेकाळी मार्क्सच्या चित्रांनी व्यापलेल्या त्याच्या घराच्या भिंतीवर आज कोणी दुसरीच विराजमान होती .त्याचे वडील उदारमतवादी विचारांनी प्रभावित होते. ते स्वतः एक नामांकित लेखक होते. उदारमतवादी विचारांच्या घरात लेनिनचा जन्म झाला होता. लहानपणापासून कम्युनिस्ट विचारधारेची पुस्तके वाचून तो मोठा झाला होता. विद्यापीठाचा विद्यार्थी प्रमुख झाल्यापासून त्याने अनेक मैदाने गाजवली होती. प्रतिगाम्यांशी संघर्षात तो नेहमीच पुढे होता. आणीबाणीत बरेच कामगार नेते अटक होत होते तरी त्याने कामगार चळवळ कमजोर पडू दिली नव्हती. धारावीतल्या लोकांशी आणि कामगारांशी तो प्रत्यक्ष भेटत होता. तमिळ भाषक लोकांनी त्याला नेता मानल होत.
बर्याच वेळ आरश्यासमोर घालवल्यानंतर तो राघवच्या घरी निघाला होता. राघव सुद्धा काॅम्रेडच होता. लेनिन स्टुडंट युनियनचा प्रेसिडेंट झाल्यानंतर त्याने त्याची साथ देण्यावर समाधान मानलं होत. तो एका रिक्षा चालकाचा मुलगा होता. राघवला नेहमीच लेनिनचा चमचा म्हणून चिढवल गेल पण तो मनावर घेत नव्हता. त्याच्या घरी गेल्यानंतर लेनिनला त्याची आई दिसली. .
" काय हो काकु राघव कुठय ?" लेनिनने विचारल.
"गेल्या असेल कामाठीपुरात दिवे लावायला ..वार नाही का त्याचा आज !" राघवच्या आईच्या उत्तरात तिचा संताप दिसत होता.
लेनिन लगेच कामाठीपुराकडे निघाला. राघव आठवड्यातून एकदा कामाठीपुरात जात होता.
हे लेनिनला माहीत होत; पण आज एकत्र जाता आल असत तरी एकटा का गेला असावा ? म्हणून तो चिंतेत होता.
लेनिनला गेल्या आठवडय़ात कामाठीपुरात आणणारा तोच होता. मैदानावरच्या भाषणात लेनिनने जोशात वेश्यांच्या मानव अधिकाराची गोष्ट केली होती तेव्हा तुला त्यांच प्रत्यक्ष आयुष्य समजून घ्याव लागेल आणि ते समजावुन घ्यायच असेल तर माझ्यासोबत चल म्हणणारा राघवच होता. ते तिथे गेले आणि तिथेच लेनिन त्याच काळीज हरवुन बसला होता.
लेनिन पहिल्यांदा कामाठीपुरात उतरला तेव्हा त्याला निळ्या हिरव्या रंगाची कच्ची घर दिसली. त्यात अनेक मुली घरासमोरच्या रस्त्यावरील लोकांवर नजर टाकत खांबाला बिलगून उभ्या होत्या.
समोर एका विणलेल्या बाजेवर एक जाड महीला लांब हुक्क्याचा पाईप ओढत बसलेली होती. स्टॅन्ड तिच्यापासून लांब असुन पाईप थेट तिच्यापर्यंत होता. तिच्या डोळ्यांला भरपूर काजळ थापलेल होत.
त्या बाईच नाव हम्जाआपा होत.ह्या कोठ्याची मालकीण. करीम लालाची खास.. हा भाग 'हम्जाबाई की कोठी' म्हणुन प्रसिद्ध होता. 15-20 मुलींना ती दिवसातून दोन टाईम शरीर विकायला लावत होती. तिची खास ओळख राघव सांगत होता.
ईतक्यात लेनिनची नजर खिडकीतून त्याच्याकडे चोरून पाहाणार्या डोळ्यांत गेली. तिचा पुर्ण चेहरा दिसत नव्हता.
"क्यो हम्जाबाई..कैसी चलरेली कोठी ? धंदापाणी मस्त ना ?" राघवने मध्येच विचारल.
"ए चिकना कौन लाया रे. खडा भी होता है क्या ईसका ?" लेनिनकडे पाहात हम्जाबाईने परत पाईपचा झुरका सोडला.
"ए बाई ये अपना नया नेता है. एक दिन यह शहर ईसके ईशारे पे चलेगा..."
"क्या कोई नया माल आया की नही..रे बाई"
" तुझे क्या करनेका हेै रे? फोकटीया ..जुनमे चढता है और पैसा डिसेंबरमे देता हे. " तिने टोमणा मारला होता.
" ए बुढ्ढी ..ये लो 2 रूपये. फुकटीया किसको बोली ..लडकी नही तो तू ईधर ही लेट ..ईधर ही लेता तेरेको ." म्हणत राघव ओरडला..
" दो रुपये मै तो रानी ही आएगी..जा रानी ईस चोमू के साथ.." हम्जाने ईशारा करताच एक तिशीतली वेश्या राघवचा हात ओढत आत गेली..
"क्यो रे ? तू पैसा नही लाया क्या ? "
"नही मै .... ." लेनिन वाक्य पूर्ण करणार ईतक्यात ईतका वेळ खिडकीत त्याच्यावर रोखून असलेली नजर समोरच्या दरवाजात उभी होती.
"सोच मत नया माल है..कलही लाला बेच के गया है ..5 रूपय दै और ऐश कर..' जन्नत की हुर है तीने उत्तर दिल
आता नकळत लेनिनचा हात खिश्याकडे गेला होता. ते 5 रूपये देउन तो तिच्यासोबत गेला.
तो आत गेला.
ती त्याच्यासमोर थरथरत उभी होती.विश्वामित्राची तपस्या मोडावी अशी ती अप्सरा होती. ति विवस्त्र होउन समोर उभी होती..तिचे दोन्ही हात तिच्या नाभीखाली तळव्यावर तळवा ठेवून होते तिची नजर त्यावरच होती.
"तुम्हारा नाम क्या है ? "
" आफसा " ती बोलली..
तिचे उरोज त्याला आकर्षित करत होते. त्याने तिला जवळ घेतल. तिच सर्वांग थरथरत होत.मनाची घालमेल सुरू होती. तिच्या अंगावर आलेला शहारा त्याला जाणवत होता .तिच गात्र न गात्र पुलकीत झाल होत.त्याचा हात तिच्या नितंबावरून तिच्या केसांकडे सरकत होता.तो तिला छातीशी कवटाळत होता.बाहेर चाललेला मुसळधार पाउसही हे मिलन पाहुन अलवार कोसळू लागला.तिचे श्वास जोर धरू लागले होते. प्रत्येक श्वास हा तापवलेल्या पाण्याच्या वाफेईतका गरम होता.तिचा श्वासांचा वेग क्षणागणिक वाढत होता. तो तिच्या शरीरावरून जिथजिथून हात फिरवत होता तिथे तिथे तिच्या शरीरावर रोमांचाने काटे उभे राहात होते. तो तीच्या जीभेशी जीभ भिडवत होता दोन सापांच्या मिलनासारख्या त्या एकमेकांशी गुंफत होत्या. तिच्या ओठांला ओठ लावून तिचा श्वास तो खेचून घेत होता .तिच शरीर तिने त्याच्या स्वाधीन केल होत. त्याच्या बाहूपाशात असताना तिची नजर बंद होती. डोळे मिटलेले होते ति पुर्णत चिंब झाली होती.
दोन शरीरांच युद्ध सुरू झाल होत श्वासांचा वेग पुर्वी पेक्षा दुप्पट झाल होत. त्याची छाती तिच्या उरोजांवरती आदळत होती.बर्याच वेळ हा शरीरांचा संगम सुरू होता ..अखेरीस सर्व थांबल..दोघांच्या चेहर्यावर एक वेगळच सुख होत. तिच्या कमलदलासारख्या शरीरातुन रक्त येत होत..तिच्या चेहर्यावर वेगळीच भीती होती.
ती त्याला कवटाळून रडत होती. लेनिन तिला समजावून निघाला होता..पण त्याच काळीज तिथच राहील होत..पुढचे सात दिवस तो सलग दोन्ही वेळ कोठीवर फक्त तिच्यासाठीच जात होता.तो तिचा एकमेव गिर्हाईक होता.त्याच्याही मनात वेगळीच भीती होती . ति सुद्धा त्याची वाट पाहात असायची.. तो दिसताच उडी मारून त्याच्या समोर जात होती.हे हम्जाबाईच्या लक्षात येत होत.त्याची ही वाढती जवळीक तिलाही नको होती.
तो आता आठवणींना उजाळा देत कामाठीपुरात पोहोचला होता. तिला आज तो सगळ सांगणार होता. त्याच्या हातातल गुलाबाच फुल वेंगाडून हसत होत. कधी एकदा तिच्यासमोर जातोय अस त्याला झाल होत. तिच्या बोलण्यातून ती सुद्धा त्याची झाली होती हे समजत होत. आज तिला घरी आणून तिच्या नावापुढे स्वतःच नाव लावायला त्याची तयारी होती.
रस्त्याच्या आजुबाजुला त्याचा हात हिसकणार्या वेश्या त्याला त्याच्यावर पुष्पवृष्टी करणाऱ्या देवता वाटत असाव्यात.
तो पोहोचला तेव्हा हम्जाबाई पाईप ओढत होती त्याला पाहताच तिने आफसाच्या कोठीकडे जाण्याचा ईशारा केला. तो रफीची गाणी गुणगुणत हातातला गुलाब गोल गोल फिरवित तेथे पोहोचला .. तेव्हा त्याच कोठीसमोर त्याला राघवच्या अंगठा झिजलेल्या विमान चपला दिसल्या..आतुन येणारे आवाज ओळखीचे होते. त्यातला प्रत्येक चित्कार त्याच काळीज चिरत होता . त्याच्या हातातला गुलाब तिथेच निसटून पडला होता.
राघवचा आतला राक्षस तृप्त झाल्यानंतर तो एका विजयी वीरासारखा सदर्याच्या गुंड्या लावत बाहेर येत होता. आफसाला बराच वेळ आधी लेनिन आलेला खिडकीतून दिसला होता . ती धावत बाहेर गेली.पण तोपर्यंत ऊशीर झालेला होता. समोर पडलेल्या गुलाबाला लक्ष नसल्याने तुडवत सदर्याच्या गुंड्या लावत चाललेला राघव तिला अंधुक दिसत होता.
-नितिन पासलकर



Comments
Post a Comment