उध्वस्त संसार - सौ. वैशाली सुनील मुन
सकाळचा प्रहार जणु धरती हिरवा शालू परिधान करून पावसाचा पाण्यात भिजून सगळीकडे ओलीचिबं झालेली धरती बरेच दिवसांनी लाजुन आपल्या प्रीयाला बघत आहे.
आज सकाळीच रजनी उठली. ती आज शाळेत जाण्यासाठी तयारी करत होती. ती जेम तेम सोळया वर्षाची, ती नववी पास झाली. आणी दहावीत गेली. तीचा घरी एकुन तीघजण आई, बाबा आणि ती फार सुखी संसार आणि ती आपल्या बाबांची फार लाडाची होती. तस ही मुलींवर बापाचा फार जीव असतो... कारण मुलगी ही परक्याच धन आहे आणि आपल्या पासून दूर जाणार या भावनेपोटी बाप तिळ तिळ तुटतो.....
रजनी दहा वाजता शाळेत गेली. शाळा हि शेजारच्या गावात असुन, तिथे पायदळच जावे लागत असे....
ती आपल्या वर्गात बसुन होती...
तितक्यात एक मुलगा तिचा वर्गात आला आणि तिला बोलवून सांगु लागला....
ए रजनी तुया बापाने तुया मायले एका काठीने डोक्याला लयी मारले आणि ती बेशुद्ध अवस्थेत आहे, हे ऐकून रजनी तिथून पडतच सुटली. ती फार थकली होती. पण कधी घरी जातो आणि आपल्या मायले बघतो. असं झालं होत आणी ती तीन कोस धावून घरी पोहचली. दारात पोहचली आणि गाईसारखा हंबरडा फोडला...
सगळ्या बायका तीची समजुत काढत होत्या. तीची माय बेशुद्ध पडली होती. ती घरांतील खाटेवर झोपवली होती. तीचा डोक्यावरील जखमेवर हळद लावून दिले होते, तरी एक बाई बोलत होती. तिथे गुप्त मार असावा. म्हणुन तीला एकदा दवाखान्यात दाखवावे. रजनीला काहीच कळतच नव्हते. बाप मारुन पळून गेला होता...
तीची माय चार पाच घरचे धुणी भांडी करून आपले घर चालवत होती. आणी तिचा बाप दारुचा आहारी गेल्याने दारु पिण्यासाठी तो पैसा मागत असे तीची माय देत नसल्याने त्याने हे कृत्य केले होते...
ती आपल्या बापाला पण काय बोलणार होती.तो एक चांगला माणूस होता. गावात इमानदारी ने
जगत होता. आणी एका कंपनीत काम करत मानाने जगत होता. पण एकदा कंपनीत खूप नुकसान झाल्याने ती कंपनी बंद करून टाकली आणि, त्यामुळे रजनीचा घरच्यावर उपासमारीची पाळी आली.अशा परिस्थितीत रजनीचा बाप शंकर वेड्यासारखा वागु लागला. तशातच, तीचा आईने त्याला चारचौघात जावुन बसत जा मन लागेल असे सांगितले तेव्हा तो चुकीचा माणसाचा संगतीत पडला आणि दारुच्या आहारी गेला. त्यात त्यांची काहीच चुक नव्हती तो खूप साधा भोळा आणि चुकीचे न वागणारा माणुस होता. पण आज तो दारूचा शौकापायी आपल्या बायकोला काठीने मारुन पसार झाला होता. रजनीला हि भीती वाटत होती कुठे आपल्या बापाची दारु उतरली तर त्याने केलेल्या कृत्याची जाणीव झाली तर तो जिवंत देखील राहणार नाही. पण ती आपल्या बापाला शोधायला बाहेर पडली नाही. कारण तीला तीचा बापाचा फार राग आला होता.
हळुहळू रजनीचा मायेला होष येवु लागला. रजनीला फार आनंद झाला...
तीचा मायेने तीला रूचा म्हणुन आवाज दिला. तेव्हा तीला झटकाच बसला. तीला क्षणभर आभाळ कोसळले असा भास झाला पण काय करणार कुणाला सांगणार म्हणुन ती चुप बसली..
माय तुले माझ नाव नाही माहीत आहे कावं माय नाव रजनी आहे तु मले काय बोलवतसं तवा तिथली एक बाय बोलली जावु दे रजनी तिया डोकयाला जखम आहे. म्हणुन जास्त भार नको पडु देवु तुझी माय जिंवत आहे ना हे मोठ समज वेळ जाइल आणि एकदा दवाखान्यात दाखवशील की समदं बरं होईल बघ,
तवा घाई नको करूस..
रजनी चुप बसली, घरात जाऊन तीने मायेसाठी आणि तिथे बसलेल्या बायासाठी चहा बनवून आणला. सगळ्या बायका हळुहळु घरी निघून गेल्या.
तीचा बापाचा काहीच पता नव्हता. तो घरी परतला नव्हता. तीचा जीव बापासाठी तुटत होता. पण कुठे शोधणार होती. आईला अशा परिस्थितीत एकटीला सोडून काय करावे काहीच सुचतं नव्हते. कशी तरी तीने राञी पिठलं आणि भात बनवले आणी आपल्या आईला चारले. आणी आपण रडतच झोपी गेली..
राञी तिने बघीतले तर आपली आई कणवत होती. पण ती काहीच करु शकत नव्हती. काय करु शकणार होती. कशी तरी राञ काढली आणि सकाळी तीने ठरवले की आपल्या आईला जिल्हाचा दवाखान्यात घेऊन जायचे पण पैका कुठुन आणणार ती...
आता शाळा शिकण्याचे सपन पूर्ण होणार नाही.आता तीला प्रश्न पडला.आईचा इलाजचा तीचा उपचारासाठी काय करता येईल ते
पण घरात तर एक ही वस्तू आणि सोने नाणे काहीच नव्हते.
आईची हालत तर फार बिघडत चालली होती. ती वेड्यासारखे वागत होती. घरातील वस्तु फेकत असे, कुणाला दगड मारत असे घरी राहत नसे, आता रजनीला घर चालवण्यासाठी धुणी भांडी काम करावं लागतं होते. त्यात तिच्या आईच्या तक्रारी खूप तिच्याकडे येत होत्या. खूप जण तीला वेडयाचा दवाखान्यात नेऊन ठेव बोलत होते. पण लोकांना काय कळणार रजनीचा मनाची अवस्था ती आई होतीना रजनीची,
बाया तिला बोलायचा, अवं तुझी माय बघ,
माया लेकराला काठीने मारते तवां आपल्या मायेला घरातं ठेवतं जा नाही तर आपल्या मायेला सांभाळून ठेव नाही तर गाव सोडुन जा..
रजनी एकांतात खूप रडत असे कुणाला सांगणार ती आपले दुःख आता सगळे संपले होते. काय करावे काहीच सुचत नव्हते. अश्यातच एकेदिवशी त्याचा गावातील पोलीस पाटलांचा घरचा तीला सांगावा आला....
त्याचा घरी एक कार्यक्रम होता, आणी तिथले भांडे घासणयासाठी तीला बोलवले होते. ती जायला निघाली, आपल्या मायेचा पाय दोरीने बांधून ती दरवाजा पाशी खूप रडली आणि ती निघाली...
ती चालत गावाचा वेशीवर पोहचली. तिथे पोलीस पाटलाचा खूप मोठा वाडा होता. घरात खूप वळदळ होती. ती दारात पोहचली, तसा एक कारभारी ती आल्याची माहिती पाटलीण बाईला दिली. तसेच पाटलीण बाईने तीला आत रजनी घरी पोहचली .घराचा दरवाजा खोलला आणि तीने आपल्या मायेला बांधलेले दोरी खोलली आणि तीने मायेला साडी दिली. तीला काहीच कळत नव्हतं. तीने आपल्या अंगावर टाकली आणि जोराने रडु लागली.
तीला कळतच नव्हते.मायेला काय झालं ते तीला दिवाळीला शंकर ने आणलेली साडी आठवली .तीने रुचा म्हणुन बोलून दाखवली. तीला वाटले आता आपला बाप असायला हवं होतं. पण नियती खूप भयानक असते, किती भयंकर वागते सगळे संपवून जगण्यास भाग पाडते. आज रजनीचे सगळे संपले. तरी तीला जगायचे होते. आपल्या आईसाठी कारण ती आपल्या मायेची माय बनली होती.
तिचे काम बघुन पाटलीण खूप खूश झाली होती. ती नेहमीच रजनीला सांगावा पाठवुन बोलवून घेत होती.
आज अचानक पाटलीण बाई खूप रडत होती. खूप वर्ष झाले तरी, तीला मूलबाळ नव्हत. घराण्याला वारस नाही. म्हणुन, सगळे कोणीच काहीच बोलत नव्हत. कारण ती पाटलांच्या मामाची पोरगी होती. ती सुंदर
होती. पण आई होवु शकत नव्हती. पण पाटलांचा खूप जीव होता तिचावर, त्याचा आईने कितीदा दुसरा लग्नाची गोष्ट केली. पण नेहमीच त्यानी लक्ष दिले नाही. जेव्हा त्याचा चुलत भावाचा मुलाला वारसदार संपत्तीचा ठरवलं. तेव्हा ती स्वतःला कोसू लागली. म्हणुन तीने एक निर्णय घेतला, की पाटलांच दुसर लग्न करून दयायचं, म्हणुन तीने रजनीला सांगावा पाठवला होता.
रजनी पाटलांच्या दारात आल्याबरोबर, पाटलीण बाईने तीला आपल्या खोलीत नेले, तेवढ्याच मायेने जवळ बसवले. आणी तीने रजनीला सांगितले की, तु जर पाटलांशी लग्न केले, तर तुझ्या आईला चांगले करण्याची जबाबदारी मी घेऊन तुला या घरात मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक सगळे मिळणार, फक्त तुला या घराला फक्त एक वारसदार दयावे लागेल.
रजनीला काय करावे काहीच सुचत नव्हते. पण तिचाजवळ काहीच पर्याय नव्हता. तीला आपल्या मायेला ठिक करायचे होते. तीचा इलाज करायचं होत पण तिच्याजवळ पैका नव्हता. म्हणुन, ती विचार करायला वेळ मागुन पाटलीण बाईला घरी पोहचली.
तीचा मनात गोंधळ निर्माण झाला होता. तिला आपल्या मायेला पूर्वा सारखे बघायचे होते.
तीला कसे बसे राञी झोप लागली. तीचा समोर पाटलीण बाईचा केविलवाणा चेहरा समोर येत होता.
आणी, रजनीने पाटलणीचा निर्णय मान्य करायचे ठरवले.
ती आपली सहमती सांगण्यासाठी ती सकाळीच,ती वाड्यावर गेली. पाटलीण बाई आपल्या खोलीत बसून विचार करत होती. तितक्यात रजनी आली हे कळताच पाटलीण पटकन जवळ बोलावून रजनीला आपल्या गळयाला लावले. खुशीत तिने रजनीचे होकार ऐकून तीला आपले पाय कुठे ठेवू असे झाले.
तितकेच रजनीला मालकीण सारखी वाड्याची वागणूक देऊ लागली....
आज रात्री पाटील पाटलीणचा खोलीत आले. तेव्हा, पाटलीण ने पाटलाकडून वचन घेऊन, आपला हट्ट पुर्ण करून, पाटलांनी दुसर लग्न करणाचं होकार मिळवला. पाटील यांनी दिलेल्या शब्दापोटी लग्नाला समंती दिली....
तसे बघीतले, तर पाटील वयाने रजनी पेक्षा मोठे होते, पण रुबाबदार माणुस होते. तितकेच शिकलेले होते. ते शहरातून शिकून आलेले होते. पण एकदा नकळत त्याची रजनीशी जातांना
वादा वादी झाली होती. त्यावेळीच
त्याना रजनी खूप आवडली होती.
पण रजनी आणि पाटलाला या गोष्टीची माहिती नव्हती.
हळुहळु रजनीचा मायेचा दवाखान्यात उपचार सुरु झाला होता. सगळे छान सुरू झाले होते.
तीला रजनीला एक आधार मिळाला होता. तो पाटलीणचा तीची माय हळूहळू बरी होत होती. लग्नाची तारीख जवळ आली. त्याच दिवशी तिचा बाप लग्नाचा घरी परत आला आणि तो पण दारु सोडून एक चांगला माणूस बनुन, त्याने आपली चुक सुधारली होती. दारु सोडुन त्याने आपल्या पोरीची आणी बायकोची माफी मागितली.
- सौ. वैशाली सुनील मुन
© 2023,Vaishali moon

Post a Comment
0 Comments