रूम नंबर १०४६ चे रहस्य (mystery of room number 1046) - Aman Kumar
(ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे.)
कॅन्सस शहरातील, मिसूरी येथील एकऐतिहासिक घटनेने संपुर्ण जगाचे लक्ष वेधले. हे एक असे रहस्य आहे की जे 89 वर्षाहून अधिक काळ उलगडलेले नाही. 90 वर्षांपूर्वी, (आताचे हॉटेल हिल्टन प्रेसिडेंट) त्या काळी प्रेसिडेंट हॉटेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सुप्रसिद्ध हॉटेलच्या रुम 1046 मध्ये एक खून झाला, ज्याचे प्रकरण आजतागायत अनुत्तरीत आहे, त्याचा खूनी अजूनही सापडला नाही.
2 जनेवरी 1935 रोजी दुपारी 12 वाजता एक माणूस, २५ - ३० वर्षाचा काळया कोटात, ज्याचे केस काहीसे तांबडे, मोठे कान, डोक्यावर क्यावर मार लागल्याची जुनी जखम आणि हातात एक सुटकेस सोबत हॉटेलच्या काऊंटर वर आला. त्याने त्याचे नाव "ओवेन" असे सांगीतले. त्याला काही दिवसांसाठी एक रूम हवी होती. त्याने आशी रूम मागीतली ज्याला बाल्कनी नसेल आणि ज्या रूमची खिडकी मागील बाजूस उघडत असेल. त्याने मागितल्या प्रमाणे त्याला रूम देण्यात आली.
एका बेलबॉयने ओवनला त्याच्या रूम पर्यंत सोडले. त्या बेलबॉईने पाहिले की ओवेनच्या सुटकेस मध्ये फक्त एक कांगावा आणि एक टूथब्रश होता.
काही तासांनंतर जेंव्हा हॉटेलची सफाई कर्चाऱ्यापैकी मेरी रूम सर्विससाठी जेंव्हा ओवेनच्या रूममध्ये गेली तेंव्हा तिने पाहिले की ओवेन हा रूम मद अंधार करून बसला आहे. तिने रूम अवराली आणि रूमचा दरवाजा बंद करू लागली, तेंव्हा ओवेन तिला म्हणाला - रूमचा दरवाजा उघडाच ठेवा, माझा मित्र मला भेटायला येणार आहे.
मित्र येणार यासाठी दार उघडे ठेवणे हे मेरीला विचित्र वाटले. तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि दार उघडे ठेऊन ती निघून गेली. हॉटेलच्या आणखी एका कर्मचाऱ्याने सुध्दा ओवेन रूम मध्ये अंधार करून बसत असल्याचे सांगीतले. त्यांच्या म्हणणयानुसार ओवेनच्या चेहेऱ्यावर भितीचे भाव दिसत होते.
नंतर पुन्हा जेंव्हा मेरी नवीन टॉवेल घेऊन ओवेनच्या रूम मध्ये गेली तेंव्हा, ओवेन पलंगावर पडलेला दिसला, पूर्णपणे अंधार होता आणि दार उघडे होते. "डॉन, मी १५ मिनिटांत परत येईन, थांब" अशी चिठ्ठीही तिने पलांगा वरती पाहिली.
दुसऱ्या दिवशी 3 जानेवारी रोजी, मेरी सकाळी 10:30 वाजता खोली साफ करण्यासाठी परत आली. तेव्हा तिला दिसले की दरवाजा बाहेरून लॉक केलेला आहे. अर्थात ओवेन खोलीतून बाहेर जाताना त्याने ते लॉक केले असावे. तिने तिच्या जवळील चावीने दार उघडले आणि रूम साफ करण्या साठी ती आत गेली. तेंव्हा तिने पाहिले की ओवेन आत फोन कानाला लावून बसला होता, रूम मधले सर्व दिवे बंद होते, ज्याचा अर्थ असा होतो की खोलीच्या बाहेरून दरवाजा कोणीतरी लॉक केला होता. मेरी अजूनही खोलीतच होती. ओवेनने फोन कॉलला उत्तर देत म्हणाला, "नाही डॉन, मला जेवायचे नाही. मला भूक नाही, मी नुकताच नाश्ता केला," "नाही, मला भूक नाही."
मेरी तिथून निघून गेली. ती जेंव्हा नवीन टॉवेल द्यायला परतली तेंव्हा तिला रूम मध्ये दोन पुरुषांच्या बोलण्याचा आवाज आला. तिने दार वाजवले, आतून आवाज आला - कोण आहे?
मेरीने बाहेरून सांगीतले की ती कोण आहे आणि ती रूम मध्ये टॉवेल ठेवायला आली आहे.
आम्हाला टॉवलची गरज नाही - असा आतून आवाज आला. त्या वेळी रूम मध्ये टॉवेल शिल्लक नसल्याचे मेरिला माहीत होते. तरी तिने तिथून निघून जाण्याचेच योग्य समजले.
त्याच रात्री, खोली 1048 मध्ये राहणाऱ्या एका महिलेने ओवेनच्या रुम मधून पुरुष आणि महिलेचा मोठ मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आल्याचे सांगीतले. ते एकमेकांना शिव्या देत असल्या सारखे तिला जाणवले.
या घटने नंतर घटना आणखीन विचित्र होत गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 जानेवारी रोजी सकाळी 7:00 च्या सुमारास हॉटेलच्या फोन ऑपरेटरच्या लक्षात आले की ओवेनच्या रूमचा फोन वापरात नसताना काही काळासाठी बंद होता. त्यामुळे, त्याने मेरीला ओवेनच्या रूममधे पाठवले. तिने दारावर पाहिले "डू नॉट डिस्टर्ब (डिस्टर्ब करू नका) असे चिन्ह दारावर अडकवले होते मेरीने ३ - ४ वेळा दार ठोठावले. आतूनआवाज आला - "आत या आणि दिवे चालू करा". परंतू दरवाजा आतुन बंद होता आणि आतून दार कोणीही उघडत नव्हत. मेरीच्या बऱ्याचदा सांगूनही कोणीही दार उघडले नाही तेंव्हा ती दार बाहेरून म्हणाली -"फोन पुन्हा हुकवर लावून ठेवा" आणि ती निघून गेली. हा प्रकार होऊन दिड तास उलटले. दीड तासानंतर अजुनही फोन बंद दिसत होता. त्यामुळे दुसऱ्या बेलबॉयला ओवेनच्या रुम नंबर १०४६ मध्ये पाठवले. त्याच्याकडे रूमची दुसरी चावी देऊन दार उघडून आत जाण्याचे आदेश दिले.
जेंव्हा दुसरा बेलबोय त्या रूम मध्ये गेला तेंव्हा त्याने पाहिले की रूम मध्ये अंधार होता फक्त टेबल वरील लॅम्प चालू होती, ओवेन बेडवर ना*ग्न होऊन झोपला होता. त्याच्या खालची बेडशीट काही प्रमाणात काळसर दिसत होती. तो बेलबॉय आत गेला आणि त्याने फोन परत रिसीव्हरवर ठेवला. २ तास नंतर पुन्हा ओवेन च्या रूमचा फोन बंद दिसू लागला. हॉटेलच्या मॅनेजरने त्याच बेलबॉयला पुन्हा रूम नंबर १०४६ मध्ये पाठवले. या वेळी जेंव्हा तो बेलबॉय रूम मध्ये गेला तेंव्हा तिथली अवस्था पाहून तो खूप घाबरला. त्याने पाहिले की ओवेन दारापासून काही फूट अंतरावर, जमिनीवर गुढगा आणि कोपर्याच्या आधाराने बसला होता. त्याने त्याचे डोके दोन्ही हातांनी धरून ठेवले होते. डोक्यातून रक्त वाहत होतं, तसेच रूम मध्येसुध्छा सगळीकडे रक्त सांडलेले होते. त्याने जेंव्हा लाईट लावली तेंव्हा त्याने पाहिले की बीड आणि रूमचा भिंती रक्ताने माखलेल्या होत्या. तो घाबरला आणि खालच्या दिशेने पाळला.
तपासणीत कळले की ओवेनचे हाथ पाय आणि गाळा दोरीने बांधून ठेवला असावा. त्याच्या डोक्यावरती बरेचदा वार करण्यात आले असावे. ज्याने त्याची कवटी फ्रॅक्चर झाली होती. तसेच धारधार शस्त्राने त्याच्या छातीत सुध्दा बरेच वार केले होते. एवढं होऊन सुध्दा ओवेन अजुनही जिवंत होता. त्याला विचारले - तुझ्यासोबत हे कोणी केले. त्यावर तो म्हणाला. कोणीही नाही.
ओवेनची मृत्यू त्या रात्री म्हणजे ५ जानेवारीच्या रात्री हॉस्पिटल मध्ये झाली. शोध कर्मचाऱ्याना त्या रूममध्ये कोणतेही शस्त्र सापडले नाही. परंतू फोन वर ४ जणांच्या हताचे ठसे सापडले. त्यातले दोन हे स्त्रियांचे असल्याचे सांगितले जाते. ओवेनने आपण लॉस एंजलिस या शहराचे असल्याचे सांगितले होते. मात्र लॉस एंजेलिस मध्ये त्याचा कोणताही रेकॉर्ड सापडला नाही. त्या कॅन्सस शहरात सुध्दा ओवेन संदर्भात काही माहिती मिळाली नाही.
बऱ्याच दिवसांच्या शोधानंतर सुध्दा ओवेनबद्दल कोणतीही माहिती न मिळाल्याने त्याचे अंत्यविधी करण्याचे ठरवण्यात आले. अंत्यविधीच्या दिवशी सकाळी एक पाकीट चर्चमध्ये मिळाले. ज्यामध्ये पैसे आणि एक चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते - ओवेनच्या अंत्याविधित कोणतीही कमतरता राहून देऊ नका. हे पैसे त्याच्या अंत्यविधी साठी वापरा.
ओवेन कोण होता, त्याला भेटायला आलेली ती स्त्री कोण होती, आणि तो डॉन कोण होता ज्याचा फोन ओवेनला आला होता या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा बराच प्रयत्न केला पण काही हाथी लागले नाही.
दीड वर्षांनी एका महिलेने ओवेनची कहाणी एका मागेझिन मध्ये वाचली. त्या कहाणी वरून आणि फोटो वरून तिने ओवनला ओळखले. तिने सांगितलं की तो ओवेन तिचा मुलगा आहे , त्याचे खरे नाव अर्तेमस आहे. त्या महिलेने नाव रुबी होते. तिने ओवेनने तिच्यासाठी लिहिलेले पत्र सुध्दा दाखवले. तिने सांगितले - माझा मुलगा ५ वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने परदेशी गेला आहे आणि मला तो तिथून नेहेमी पत्र लिहितो. मात्र रुबीला ओवेन मेल्या नंतर सुध्दा ३ पत्र मिळाले होते. ते पत्र कोणी लिहिले हे अद्याप कळलेले नाही.
- अमन कुमार

Post a Comment
0 Comments