वाट पाहीन त्या वळणावर - शरणप्पा नागठाणे (Vaat pahin tya valanavar - Sharanappa Nagthane) Marathi story

मुरलीने तिसऱ्यांदा फोन केला, तेंव्हा जाऊन कुठे रामने त्याचा काॅल घेतला....

" Congratulations राम, अभिनंदन !!.. पुढच्या महिन्यात सिंगापूरच्या आर्ट अँड म्युझीयम गॅलरी मध्ये तुझ्या टेंपल फोटोग्राफीचे प्रदर्शन होणार आहे ..." 


मुरलीचे बोलणं ऐकून राम उर्फ के.रामचंद्रन् ला विश्र्वासच बसेना कारण सिंगापूरला कुठली तरी आर्ट गॅलरी आहे आणि त्यात फोटोग्राफीचे प्रदर्शन असणार आहे , हे त्याला माहीतच नव्हतं...मग त्या प्रदर्शनात भाग घेण्याचा प्रश्नच येतोच कुठे ??...

रामने विचारलं - " तुला कुणी सांगितलं ??.."

मुरली म्हणाला - " ह्या सगळ्याचा कर्ता, करविता मी आहे... तेंव्हा आता जास्त चांभार चौकशा करू नकोस... समजलं ??.."

" अच्छा हा तुझा प्रताप आहे तर.. बरं.. बरं ठीक आहे.."

रामचंद्रन विचार करू लागला तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की तीनच महिन्यापूर्वी आपल्या ९६ बॅचच्या वर्गमित्रांचे जे गेट टुगेदर झाले होते , तिथं हे सगळं ठरलं होतं आणि मुरलीने त्याला अंधारात ठेवून सगळं घडवून आणलं होतं...

जानू ही आपला नवरा आणि मुलीबरोबर सिंगापूरलाच असते...मग ह्यात एकट्या मुरलीचा सहभाग होता की जानूचा ही ??..


जानू उर्फ जानकी ...

रामचंद्रनची क्लासमेट आणि his First & Last crush !!!....

 सिंगापूर ...

प्रदर्शन ...

आपण जानूला एवढ्या लवकर पुन्हा भेटणार ही कल्पनाच राम साठी सुखद होती.. 

काय नशिब असतं साला, मागच्या वेळी २२ वर्षांनंतर भेट झाली होती.. ती चक्क २०१८ मध्ये आणि फक्त आता ३ महिन्यातच...

रामने मुरलीला बजावले, -" हे बघ.. जास्त हुरळून जाऊ नको.. ही बातमी ग्रुपवर ही शेअर करू नको, अगदी शुभा दीदीला तर अजिबात सांगू नकोस... शुभा दीदी म्हणजे आकाशवाणी आहे आकाशवाणी... ती जगभर सांगत सुटेल... let us give surprise to Jaanu .."

  मुरलीला देखील ही आयडिया एकदम थ्रिलिंग वाटली ...

" ओके बाॅस.."


* * * *

रामचंद्रन ट्राव्हल फोटोग्राफर होता...त्याच्या फोटोग्राफीचा मुख्य विषय होता दाक्षिणात्य भारतीय मंदिरे ... 

हंपी पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला शिल्पकलेचा अद्भुत पट त्यांने आपल्या कॅमेऱ्यात अप्रतिम रितीने कैद केला होता..त्याच्या फोटोला काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही मिळाले होते...

सिंगापूर पर्यटनासाठी प्रसिद्ध देश... 

मलेशिया, सिंगापूर मध्ये बरीच तामिळ मंडळी स्थाईक झाली आहेत... अशा लोकांच्या पुढाकाराने आपला सांस्कृतिक ठेवा असलेल्या मंदिराच्या फोटोग्राफीचे प्रदर्शन भरविले जाणार होते..‌.

आपल्या देशातील जेवढे पर्यटक दक्षिण भारतात जातात त्यापेक्षा कितीतरी अधिक भारतीय मलेशिया सिंगापूरला पर्यटनासाठी जातात....

सिंगापूरला येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांना भारतीय मंदिराच्या स्थापत्य कलेचा परिचय व्हावा, त्यांना भारताला भेट द्यावी, टुरीझम वाढावं हाच ह्या प्रदर्शनाचा हेतू होता म्हणून इंडियन टुरिझम मिनिस्ट्री तर्फे हे आयोजन करण्यात येणार होते..

* * * *

राम आपल्या अपार्टमेंट मध्ये आला...

आपल्या आठवणीचा पिटारा - " ती सुटकेस " - उघडली..

तीन महिन्यांपूर्वी गेट टुगेदर आटोपून आपण जेंव्हा रात्री चेन्नईच्या रस्त्यावर भटकत होतो, तेंव्हा अचानक पाऊस आला... आडोसा शोधे शोधेपर्यंत आपण ओले झालो...

 जानू ही पावसात भिजली..

दोघं ही फ्लॅटवर परत आलो...

 जानूने तिचे भिजलेले कपडे कोरडे होईपर्यंत आपला ड्रेस घातला होता...

तो ड्रेस त्याने तसाच सांभाळून बॅगेत ठेवून दिला होता... आपल्या १० वीच्या स्कुल बॅगमधून त्याने तो काढला.... चेहऱ्यासमोर धरला... आणि‌ जानूच्या आठवणीत रमून गेला... 

आपली शाळा...

आपला वर्ग....

आपले वर्गमित्र...

आपली आणि जानूची नजरभेट.. हळूहळू फुलणारं प्रेम... 

एखाद्या दिवशी जानू दिसली नाही तर आपली होणारी घालमेल...

पुढं तिच्या वडिलांची बदली झाली...

 जानूचं आपलं शहर , आपली शाळा सोडून जाणं...

आपण तिला तिच्या शहरात खास भेटायला जाणं आणि तिच्या घरच्यांनी अपमानित करणं...

जानूचं लग्न...

आपण चोरांसारखं तिच्या लग्नाला लपून छपून जाणं...

 सगळं सगळं आठवणीत तरळून गेलं ...

त्या दोन तासात रामचंद्रन् जानूच्या आठवणींच्या सोबतीने सबंध तंजावर परिसर फिरून आला.


* * * *

सिंगापूरच्या फ्लाईटमध्ये बसतांना ही रामच्या मनात प्रदर्शनापेक्षा जानूचेच जास्त विचार होते...

आपण जानूला सरप्राइज देणार हे खरं पण तिला, तिच्या नवऱ्याला कसं वाटेल ???... will he take it in right spirit ??....

त्याचं मन त्याला म्हणालं - " त्यात काय एवढं ?!... तो नव्या जमान्यातला माणूस आहे... नविन विचारांचा गडी आहे... फ्रेंडशिप बद्दल तो कलुषित विचार नाही करणार ..."

समजा त्यांने सगळं चांगल्या भावनेने घेतलं तर मग सिंगापूर मध्ये जानू बरोबर आपण वेळ कसा घालवायचा ह्या कल्पनेत राम रमून गेला..

आपण जानू सोबत Universal studio ला भेट देऊ... नाईट सफारी करू...सॅन्टोसा आयलंड मध्ये फिरू अशी स्वप्नं रंगवत तो त्यात गुंग होऊन गेला.

* * * *

सिंगापूरच्या Art & Museum Gallery मध्ये पहीला दिवस मस्त गेला....

लोकांनी त्याच्या फोटोग्राफीचे भरभरून कौतुक केले...

वेगवेगळ्या मंदिरांबद्दल चौकशी केली..

५ वाजता आर्ट गॅलरी बंद झाली तसं रामने टॅक्सी केली आणि जानूचे अपार्टमेंट गाठले..

लिफ्ट मध्ये ६ व्या मजल्याचं बटन दाबतांना त्याचा हात थरथरत होता...

लिफ्टमध्ये त्याचं हृदय जोरजोरात धडकत होतं..

लिफ्ट थांबली...

लिफ्ट पासून जानूच्या फ्लॅट पर्यंतच्या प्रवासात आपलं हृदय शरीरातून बाहेर पडतं की काय असं त्याला वाटून गेलं...

हळूहळू चालत तो जानूच्या फ्लॅटच्या दारात पोहचला...

धडधडत्या छातीने त्यांने बेल दाबली...

क्षण दोन क्षण गेले....

जानूने गडबडीत दरवाजा उघडला आणि रामला समोर बघून तिचा चेहरा पांढराफट्ट पडला...

रामचं हृदय जोरजोरात धडकी मारत होतं..

जानूचं ही....

फक्त कारणं वेगळी होती..

माहीत होते म्हणा किंवा सवयीने जानूने आपला हात त्याच्या हृदयावर ठेवला...

आणि त्याची हृदय गती नाॅर्मलला आली.....


* * * *

जानूचा चेहरा पाहून रामला समजलं की आपण सरप्राइज द्यायला आलो होतो पण झालं होतं उलटं...

 जानूला धक्का बसला होता...

पुढचं सगळं रामने जे पाहीलं ते अकल्पनीय होतं...

घर अगदी शांत होतं पण ती एक प्रकारची विचित्र शांतता होती..

घरात जानू व्यतिरिक्त इतर कोणी असेल असं दिसत नव्हतं.. 

आवाज येत नव्हता.. हालचाल जाणवत नव्हती...

३ महिन्यांपूर्वी - गेट टुगेदरच्या वेळी जानूने सांगितले होते - " सिंगापूर मध्ये माझी लहान मुलगी आहे..नवरा आहे .."

 पण त्यांचा कुठे ही मागमूस दिसत नव्हता..

रामने तिला विचारले - " जानू , तुझी मुलगी ??..तुझे मिस्टर ??.."

जानूने उत्तर दिले नाही...

  रामचा हात धरून त्याला आपल्या बेडरूमकडे घेऊन गेली आणि बेड कडे बोट दाखवून म्हणाली, -'' Meet my husband Mr Shravanan.. "

  एक पॅरलॅसिस झालेली व्यक्ती बेडवर पडली होती....

" युवर हजबंड !!!!??..'' - प्रश्र्न विचारायची ही हिम्मत झाली नाही...

रामला वाटलं की आपल्याला कोणी तरी ४४० व्होल्टचा जबरदस्त झटका दिला आहे..

Shocked ....

 अचानक एखादी मोठ्ठी कांच आपल्या चेहऱ्यावर आदळून तिचे तुकडे खोलीभर विखुरले आहेत - असा त्याला भास झाला...

* * * *

आता आपल्याला क्षणभर ही इथे थांबणं शक्य होणार नाही असं रामला वाटलं..

" I am extremely sorry जानू , मी निघतो.." - शब्द फुटत नव्हता तरी अस्षटसं राम बोलला..

" थांब, तो झोपला आहे...आता सकाळ पर्यंत तो जागा होणार नाही.. आपण बाहेर जाऊ.. जे बोलायचं राहून गेलं होतं ते आज बोलू...ऐकू...थोडं मोकळं होऊ .." - जानू बोलली...

जानूच्या विकलांग नवऱ्याकडे बघून रामला जाणवलं की आपल्यावर शेकडो टनांचं ओझं पडलं आहे...

पाय उचलत नव्हते...

मोठ्या मुश्किलीने तो लिफ्ट पर्यंत आला...

जानूने कार काढली..

दोघेही बराच वेळ फिरत राहिले... एकमेकांकडे न पहाता... एकमेकांशी एक शब्द ही न बोलता...


* * * *

दोन तीन तास वेड लागल्यागत फिरले...

अखेर दोघं ही समुद्र किनारी येऊन बसले...

समुद्र ....

सगळ्यांचा जवळचा मित्र... 

तो सगळ्यां गोष्टी सामावून घेतो...

कुठलीही तक्रार न करता....

तुम्हाला आनंद झालाय - इथं या, समुद्राच्या वाळूत बेहोश होऊन नाचा...तो तुम्हाला साथ देईल...

तुम्ही दुःखी आहात - इथं या , समुद्राच्या किनाऱ्यावर शांत बसा...तो धीरगंभीर आवाजात तुमचं सांत्वन करील...

राम आणि जानू वाळूत बसले...

निशब्द ... 

काय बोलावं - कसं बोलावं - किती बोलावं ते दोघांना ही समजत नव्हते....

अखेर जानूनेच कोंडी फोडली अन् विचारलं, -" असा अचानक आलास ?.. फोन नाही...मेसेज नाही ..''

राम तिच्याकडे न बघता थोडासा घुश्शातच बोलला - " फोन करून आलो असतो तर बरं झालं असतं...तुला ही काही तरी बहाणा करता आला असता, काही तरी कारण सांगता आलं असतं.. मला टाळता आलं असतं.. नाही का ? " 

अशा परिस्थितीत ही थोडं हसत जानू म्हणाली,-" अरे व्वा, तुला तर माझ्या वर रागावता ही येतं की ..."

" मी कोण आहे तुझा जानू .. कोणत्या नात्याने रागावू तुझ्या वर.... माझ्या फोटोग्राफीचे प्रदर्शन इथं भरलं आहे...तुला सरप्राइज द्यावं म्हणून मी तुझ्या कडे आलो पण ..."

रामला पुढे अक्षर ही बोलवेना...

" पण आता वाटतं की नसतो आलो तर बरं झालं असतं... दृष्टी आड सृष्टी ...तु सुखी आहेस हा भ्रम तरी कायम राहीला असता... bad luck ते होणं नव्हतं ..''

  थोडा वेळ कोणीच बोललं नाही...

फक्त समुद्राच्या लाटांचाच काय तो आवाज येत होता...

  रामनेच प्रश्र्न केला ,-" गेट टुगेदरला भेटलीस तेंव्हा तु म्हणाली होती की तुला एक मुलगी आहे... ती कुठे आहे ?...का ते ही तुझ्या सुखी असण्यासारखंच खोटं होतं ?" 

 जानू -" ते खोटं नाही राम, मला मुलगी आहे..ती अमेरिकेत असते, तिच्या मोठ्या काकांकडे, आजी आणि आजोबा सोबत..."

राम -" अमेरिकेत - का ?"

जानू -'' That's a long sad story राम , ऐकून तुला वाईट वाटेल.. माणसानं दुःख शेअर करू नये... उगाच दुसऱ्याला दुःखी करु नये ..."

राम - " मी दुसरा - परका झालो म्हण की .."

 जानू - " तसं नाही...तुला ऐकायचं आहे तर ऐक...जसं माझं लग्न माझ्या इच्छेविरुद्ध झालं होतं तसंच माझा नवरा श्रवणनचं ही... माझ्या नवऱ्याचे ही लग्न त्याच्या मर्जीविरूद्ध लावलं गेलं होतं... Shravanan was in relation with another girl of lower cast..हे श्रवणनच्या घरच्यांना पसंत नव्हते...एवढी शिकलेली सुशिक्षित माणसं पण जातपात मानणारे... अगदी अमेरिकेत असलेल्या मोठ्या भावाला, बहीणीला देखील जातीचं वावडे होते.. त्यामुळे श्रवणन नेहमी tense असायचा...तुझी बहीण पळून गेली होती... तुझं character देखील तसंच असेल असं मला म्हणायचा...हिणवायचा... माझे मोबाईल calls, फेसबुक वगैरे चोरून पहायचा.. Life was like hell पण मार्ग नव्हता.. he kept spying my office too.... "

राम - " तुझे आई-वडील किंवा सासू-सासरे ...what was their role then?.."

जानू उदासपणे हसली ....

जानू - " you know Ram, आजच्या काळात ही मुलगी म्हणजे आई-बाबा साठी ओझंच असते...शेकडो वर्षांपासूनची ती मानसिकता आजही तशीच आहे...आणि सासू सासरे म्हणशील तर हेच म्हणणार की बाई गं आम्ही एवढी वर्षे सांभाळून पोरगा तुझ्या हवाली केला आहे... Now it's your look out... थोडक्यात तुझं नशीब तुझ्या संगे ...माझे सासू सासरे जास्त वेळ USA ला रहातात...श्रवणनच्या असल्या वागण्याने मुलीवर - आपल्या नातीवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तिला अमेरिकेला आपल्या कडे ठेवून घेतले आहे.. they hardly care about us.."

राम - " very bad .."

जानू - " लग्न झाल्या नंतर ही श्रवणन आपल्या मैत्रीणीला भेटायचा... पण नंतर नंतर त्यांच्यात काय बिनसलं माहीत नाही..तो खूप प्यायला लागला..one day he was driving while drunk.. met with an accident ... severe accident... ब्रेन हॅमरेज झाला आणि उजवी बाजू कायमची लुळी पडली, कायमचा अधू झाला.. paralytic..."

राम -" I am so sorry , खूप भोगलंस तू....पण मग आपल्या गेट टुगेदरच्या वेळी तु सगळं कसं आलबेल आहे असंच भासवलंस .. ते का ?

जानू - " काय सांगणार ? आपण गेट टुगेदर कशा साठी करतो ??... आनंद शेअर करण्यासाठी ना ??.. मग !!!.. तिथं आयुष्यातील दुःखं कुठं सांगत बसणार ?...राम, आजकाल लोकांना चांगल्या गोष्टी देखील आवडतात की नाही ह्या बद्दल शंका वाटते...तिथं मित्रांसोबत दुःख शेअर करून आयुषभराच्या सहानुभूतिचे ओझे कुठे वहात बसणार ?!!!"

राम - " जानू , एवढं सगळं सोसण्यापेक्षा तू परत का आली नाहीस ? ... खरं सांगायचं तर मी तेंव्हा ही आणि आज ही तुझी वाटच पहातो आहे त्याच वळणावर...."

जानू काहीच बोलली नाही...थोडा वेळ दोघं ही स्तब्ध...

जानू बोलू लागली -" राम, आपण ज्याला प्रेम प्रेम म्हणतो ना - ते फक्त १० टक्केच असतं...बाकी ९० टक्के आपण समाज,भविष्य, पैसा आणि नशिब ह्यांचीच चिंता करत असतो.. तसं नसतं तर मला तू लग्न मंडपातून घेऊन गेला असतास ना... आयुष्यात फक्त प्रेम प्रेम असतं तर करोडो लैला- मजनू , हिर- रांझा , रोमिओ ज्युलियट सारखी उदाहरणे दिसली असती....जी गत तुझी तीच गत माझी ही....मी ही मुकाट्यानेच लग्नाला उभी राहिले ना... जेवढा दोष तुझा आहे तेवढाच माझा ही आहे...राम आता तर ते अशक्य आहे.. मी तुझ्याकडे आले तर समाज काय म्हणेल?? .. माझ्या मुलीच्या मनांवर काय परिणाम होईल?... तिच्या भविष्यावर काय परिणाम होईल?..आपले नातेवाईक काय म्हणतील ?..आणि मुख्य म्हणजे माझा लुळा पांगळा नवरा .. तो भूतकाळात कसा ही वागला असेल पण today he is totally dependent on me.. त्याला अशा परिस्थितीत सोडणं म्हणजे ती एक प्रकारची हत्त्या केल्यासारखंच नाही का ??... मला सांग राम , एवढी सगळी ओझी घेऊन आपण सुखी राहू शकू??"

राम निरुत्तर ....

राम -" आता पुढे ?"

जानू - " पुढे ? ...पुढे काय ? We were best friends...we are friends & will remain friends forever..प्रेम आपल्या ठिकाणी कायम आहे...मग ते नातं मैत्रीचं असो की आणखी कुठलं ही...राम, निसर्गसौंदर्य हे नेहमी दुरूनच चांगलं दिसतं, ते नेहमी दूर राहूनच पाहीलं पाहिजे.. feel केलं पाहिजे...जवळ जाऊन पाहिलं तर त्यात दगड माती या पेक्षा अधिक वेगळं काही नसतं..

तु नेहमीच म्हणतोस ना की फक्त फोटोग्राफी मध्येच काळाला देखील फ्रिज करण्याची ताकद आहे... only Photography has power to freeze Time , nobody else.. अगदी तशीच , तेवढीच ताकद आठवणी मध्ये देखील आहे.. I wanted to live in those childhood, teenage moments of affection and love forever ... 

Love and life are two different things ... better not to mix it...

कुठल्याही गोष्टीचा आनंद ती मिळविण्याच्या कल्पनेत जास्त आहे, ती गोष्ट मिळाली तर तो आनंद टीकेलच याची शाश्वती नाही.. कुठल्यातरी शायरने म्हटलं आहे -

" अंखियों को रहने दें , अंखियों के आसपास..

दूर से मिटती - बुझती रहें प्यास ..."


बराच वेळ झाला होता..

बोलाण्यासारखं खुप होतं पण म्हणतात ना - " जब बहुत कुछ कहने को दिल करता है - तब कुछ ना कहने को दिल करता है -"

 दोघेही उठले..

 कार कडे निघाले..

राम आपल्या destiny वर हसला...

केवळ ३६ तासांपूर्वी आपण काय काय plan केलं होतं....

  जानूला भेटू ...

एक रात्र तिला तिच्या नवऱ्याकडून उसनी घेऊ..

 तिच्या बरोबर candle light dinner करू ... 

रात्री उशिरा पर्यंत सिंगापूरच्या रस्त्यावर फिरू...

 नाईट सफारी करू...santosa island बघू असे कितीतरी तरी plan केले होते...

" Man proposes - God disposes " - शेवटी हेच खरं!!

  जानूने हाँटेलच्या entrance वर कार उभी केली...

राम कार खाली उतरला...

जानू म्हणाली, - " राम, मी मागच्या वेळी ही तुला म्हणाले होते आणि आज ही तेच सांगते की एखाद्या चांगल्या मुलीबरोबर लग्न कर.. नव्यानं आयुष्याची सुरुवात कर...''

रामने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, - " you always trust in Destiny.. today I too started believing it... so if it's true I will wait for you.. मी तुझी त्याच वळणावर वाट पहात उभा आहे आणि असेन.. ज्या वळणावर दुर्दैवाने आपण एकमेकांपासून दूर गेलो.."

 राम हाँटेलमध्ये निघून गेला... पाठीमागे वळून न पाहता..

Goodbye न करता ....

" Never say Goodbye to one for whom you have decided to wait forever !!"

Comments