उबंरठा - सौ. वैशाली मुन (Umbaratha by Vaishali Moon)
आज सकाळीच साई आँफीसला निघाली. सकाळीच तिचे नवराशी भांडण झाले होते. काही ना काही कारण काढुन तीचा नवरा सारखा ञास देत होता .आज तर सकाळीच सुरू झाला आणि वाद इतका वाढला की नवराने तीला गालावर एक झापड मारले.
ती सकाळी आठ ला घरुन आँफीसला जायची आणि राञी घरी यायला तीला सात वाजायचे, मग फेश होवुन जेवन इतर कामे आटपून तीला झोपायला बारा वाजत असे. ती फार थकुन जात होती, पण कुणाला सांगणार होती, शेवटी संसार होतांना तीचा आणि सुखी पण होती, पण इतक्यात तीचा नवराचा स्वभाव तीला कळतच नव्हता.सारखा टोमणे मारणे, शिव्या देणे सुरू असायचे, ती रडतच घराबाहेर पडली. दारातच तीला अँटो भेटला. आणि ती बसुन रेल्वे स्टेशनवर पोहचली. अँफीसचा मार्गवर जाणारी रेल्वे लागुनच होती. ती धावत धावत आत चढली. आज ती फार थकली होती, शरीरापेक्षा मनाने थकले की, हे दुःख कुणापुढे मांडता पण येत नसते. नकळत रमाने तीला,
आवाज दिला,
साई आज उशीर का केला, रमा बोलली,
साई बोलली अगं कामाचा व्यापत वेळ कळतचं नाही बघ कसा जातो ते,
आणि रमाला जवळच सीट भेटली, आणी साई उभ्यानेच प्रवास करत होती. आणि ती आपल्याच विश्वात मग्न झाली. एकदम आठवले ते दिवस जेव्हा तीची ओळख यश सोबत झाली होती. यश हा एका कार्यक्रमात तीला भेटला होता. पण ती त्याचाशी बोलली नव्हती. यश दिसाला देखणा नव्हता. पण एक रुबाबदार माणुस होता. आणी साईला प्रथम दर्शनी तीला आवडला होता. आज अचानक तिला एक एक जुनी गोष्ट आठवत होती. त्याचाशी आपली कशी मैञी झाली. आणी आपण त्याचे प्रेम कसे नाकारले, हे डोळयासमोरून जात होते. तीला आठवले की, एका रविवारी मोबाईल घेऊन बसली आणि फेसबुक ओपन केले. तर यशची friend request आलेली पाहून तीला झटकाच बसला, आणि तिने लवकरच friend request accept केली. ती आतून खूप खुश झाली होती.
मग यशचा मेसेज आला
हँलो मी यश,
हाय, मी साई
अशाप्रकारे दोघांची ओळख झाली. मग रोजच बोलणे सुरू झाले. साई शुभसकाळ आणि शुभराञीचे मँसेज टाकाची दोघांत खूप छान मैत्री झाली होती. यश ने एकदा तीला आपल्या भावना पण बोलुन दाखविल्या की साई त्याला खूप आवडते म्हणून, पण साईला माहिती होते की, आपण विवाहित आहोत त्यासोबत आपले आपल्या नवरांवर खूप प्रेम आहे. आणि म्हणुन तीने यशचा प्रेमाचा स्वीकार केला नव्हता. यशला नेहमी वाटायचे तीला भेटावे, बघावे, बोलावे पण तीला हे योग्य वाटत नव्हते आणि तिने यश पासून दूर होण्याचा निर्णय घेतला. तिकडे यश पण डिप्रेशन मध्ये गेला होता. आता ती पण त्याला टाळत होती. एखाद्या नात्याला नाव नाही देता येत असेल तर असे नाते ठेवायचे कशाला हया विचारांची ती होती. आणि आज अचानक तीला यशची खूप आठवण येत होती. काय झालं होतं तीला,
आणी रेल्वे थांबली आणि डब्यातून खाली उतरली.नकळत,तीचे लक्ष यश कडे गेले.....
आणी ती धावतच जाऊन यशचा मिठीत शिरली....
असा हा उबंरठा भावविश्व लघुकथा एका विवाहित स्रीची व्यथा... ..
- सौ. वैशाली सुनील मुन



अप्रतिम कथा...स्त्रीमनाची व्यथा मांडणारी...👏👏💐💐
ReplyDelete