माधुरीची भाग्यरेषा - कु. वलवे भाग्यश्री ज्ञानेश्वर

काल संध्याकाळी अशीच निवांत बसलेली असताना मनात विचार आला,

लघुकथा! कशी ? कुठुन? आणि कोणत्या विषयावर लिहायची? तशीच थोडा वेळ शांत राहून विचार केला आणि माधुरीचा चेहरा डोळ्यासमोर आला. स्वतःच्या मनाने रचुन किंवा इंटरनेटवरून कथा कॉपी करण्यापेक्षा माधुरी आणि तिचं जीवन यावरच लिहावं असं ठरवलं आणि मी लिहू लागले.



माधुरी हि अतिशय गरीब घराण्यात जन्माला आलेली एक अतिशय सर्वसाधारण मुलगी, घरात अठराविश्व दारिद्रय. आईला प्रपंचाला चिंधी लावता लावता मुलाबाळांची हौस करताच आली नाही. वडील कट्टर दारू पिणारे, भाऊ लहान. आई मोलमजूरी करून मुलांना शिकवायची.

माधुरी खूप हुशार होती. शाळेतील पहिला नंबर तिने कधी सोडलाच नाही. 4थीला शिष्यवृत्ती परिक्षा असो, 5 वीची नवोदय असो, वीची शिष्यवृत्ती असो सगळ्या शालांत परिक्षेत सुद्धा तिने ? राज्य पातळीवर नंबर पटकावले. शाळेतील आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या आणि यासार- ख्या अनेक स्पर्धांमध्ये माधूरी नेहमीच अव्वल स्थानी असायची. एवढेच नाही तर ब्युटी काँटेस्टमध्ये भाग घेतसुद्धा माधुरीने प्रथमच क्रमांक पटकावला. एकूणच सर्वगुणसंपन्न असणाऱ्या या मुलीच्या यशावर सर्वच नातेवाईक, शिक्षक आणि ग्रामस्थ खुश होते.


तिला तिच्या यशासाठी सर्वच स्थरावर चांगला प्रतिसाद मिळत - असल्यामुळे ती खूपच जोमाने अभ्यास करू लागली. यावर्षी तिचे दहावीचे वर्ष होते. काहीही झाले तरी बोर्डात नंबर पटकावयचा असा निश्चय करत तिने मन लावून खूप अभ्यास केला. आणि माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी बोर्डला संपूर्ण राज्यात पहिली आली. माधुरीचे हे धव- घवीत यश पाहून तिच्या आईच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटायचे . सर्व गोष्टी अवाक्याबाहेर असतांना, घरची परिस्थिती नाजूक असताना केवळ जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ती एकापाठोपाठ एक यश मिळवत गेली.

माधुरीच्या यशाचा आनंद तिच्या वडिलांनाही खूप होता. त्यांचा तिच्यावर खूप जीव होता. तिच्या या आनंदासाठी त्यांनी तिला खूप शाबासकी दिली. त्यानंतर त्यांनी माधुरीला इंजिनीअर बनवायचे ठरवले. ज्याप्रमाणे आपण मोलमजूरी करून दिवस काढले. ते आपल्या मुलीच्या वाट्याला निश्चितच येणार नाहीत असा विचार करून त्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी पाठवले. तशातच माधुरीच्या वडिलांना रक्ताचा कर्करोग असल्याचे समजले. 

खूप उपचार केले. तज्ज्ञ आणि हुशार डॉक्टरांचा सल्ला घेतला, परंतू त्यांचा आजार आवाक्याच्या बाहेर गेलेला होता, त्यांचा मृत्यू झाला. माधुरी आणि एकंदरीत सर्वच कुटुंबावर दुःखाचा आघात झाला. घरातील पितृछत्र हरपले. माधुरीचे 12 वीचे वर्ष होते. तिच्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. परंतु तिने धीर सोडला नाही. पुन्हा सावरत तिने अभ्यास करून 12 वी बोर्डातही घवघवीत यश मिळवले, आणि तिच्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय करत सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला.


'वडिल नेहमी म्हणायचे; खूप मोठी हो माधूरी, खूप अभ्यास कर, यश मिळव आणि तुझ्या आईवडिलांचं नाव साकार कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही मोठी झालीस, तरा तुझ्या आईवडिलांची मान कधीच खाली गेली नाही आजवर, याचा विचार कर : माधुरी आपल्या वडिलांचे हे शब्द अगदी मनावर कोरत जीवन जगत होती. इंजिनीअर होण्यासाठी आणि खूप मोठी होण्यासाठी धडपडत होती. इंजिनिअरिंग च्या तिसऱ्या वर्षात असताना तिची भेट तिच्याच कॉलेजमध्ये असलेल्या रमेश नावाच्या मुलाशी झाली. तोही तिच्यासारखाच हुशार आणि होतकरू असल्यामुळे दोघांची मैत्री झाली. एकत्र अभ्यास करत, खेळत आणि एकमेकांना एकमेकांची दुःखे वाटत दोघेजण कॉलेजच्या शेवटच्या वर्षांत शिकत होते.


'रमेशला आई नव्हती. त्याची आई तो लहान असतानाच मरण पावली होती. आणि माधुरीला वडील नव्हते. दोघेही जवळजवळ, समदुःखी होते. त्यामुळे त्यांच्यात जवळीक वाढत गेली. दोघांना आई. वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण होती. एकमेकांना दोघेही समजावून घेऊ लागली. माधुरी खूप अभ्यास करत होती. त्याचप्रमाणे रमेशही कष्ट घेत होता. दोघांनी आपापल्या क्षेत्रात अव्वल गुण मिळवायचे ठरवले. इतर मुलांप्रमाणे बालिशपना नव्हता. दोघांमध्ये घनिष्ट मैत्री परंतु समाजातील काही कंटकांना त्यांचं चांगलं चाललेल पहावत नव्हते. त्यांची मैत्री कशी तुटेल यासाठी कॉलेजमधील काही मंडळी प्रयत्नशील होती.

एकमेकांच्या क्षेत्रांत इंजिनिअरिंग मध्ये विद्यापीठात पहिले आले. दोघांना शेवटच्या वर्षाचा निकाल लागला, माधुरी आणि रमेश दोघेही चांगले गुण मिळाले. माधुरी आवडू लागली होती. माधुरी हुशार आणि खूप आनंद झाला. कॉलेज पूर्ण झाले. दोघांनाही घवघवीत यशही मिळाले. रमेशलाही माधुरी आवडायला लागली होती. माधुरी दिसायलाही सुंदर असल्यामुळे कॉलेजमधील अनेक टपोरींचा तिच्या वर डोळा होता. पण रमेश सारखा हुशार आणि होतकरू मुलगा तिच्या आयुष्यात होता. रमेशने नोकरी लागताच माधुरीला लग्नासाठी विचारायचे ठरवले. त्याला इन्फोसिस नावाच्या कंपनीने नोकरीसाठी सिलेक्ट केलं. रमेशला खूप आनंद झाला. त्याने माधूरीबद्दल घरी बाबांना सांगायचं ठरवलं, बाबांनाही खूप आनंद झाला. योग्य वेळ पाहत रमेशच्या बाबांनी माधुरीच्या आईकडे मागनी घातली, 'मला मुलगी नाही. तुमच्या मुलीला आम्ही आमच्या माधुरीला लग्ना कंपनीने नोकरी "माधुरीचा हात मागितला. माधुरी रमेशला मागच्या अनेक वर्षांपासून "ओळखत होती. त्याचा स्वभाव आणि त्याच्या सवयींसहीत त्याला मागच्या कितीतरी दिवसांपासून अनुभवत होती. त्यामुळे तिनेही लग्नाला

पण रमेशसारखा जास्त आढेवेढे घेतले नाहीत. ती हसत हसत रमेशबरोबर तयार झाली.


दोन महिन्यांनी लग्नाचा मुहूर्त पक्का करायचा असे ठरले. माधुरी आणि रमेश एकमेकांच्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवू लागले. दोघांनी मिळून भावी जीवनाचे व्यवस्थित प्लॅनिंग केले. बोलता बोलत दोन महिने निघून गेले. लग्न झाले. ठरल्याप्रमाणे त्यांच्या सुखी जीवनाची सुरुवात झाली, दोघांनी नोकरी करत, त्यांच्या वैवाहिक जीवनातील सुखद क्षण जगत आयुष्याची आणि वैवाहीक जीवनातली काही वर्षे जगली. लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली. त्यांचा संसार अतिशय सुखद आणि कुणालाही हेवा वाटावा असाच चालू होता. काही दिवसांनी अचानकच माधुरीच्या पोटात दुखू लागले काही तरी खाण्यात आले असेल असा विचार करत तिने दुर्लक्ष केले, पण पुन्हा काही दिवसांनी तिला तसेच जाणवले. तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरला दाखवून काही औषधे घेतली. तिला तात्पुरते बरे वाटले. रमेश माधुरीच्या बाबतीत खूप जास्त प्रोटेक्टिव्ह होता, त्यामुळे तिने त्याला या संदर्भात काहीही कल्पना दिली नाही. परत असा त्रास होनारच नाही असे तिला वाटले. पण तिचा अंदाज चुकीचा ठरला. तिला आधीपेक्षा खूपच जास्त जोराने पोटात दुखू लागले. मग तिने रमेशला झालेला सर्व प्रकार सांगितला. रमेशने तिला ताबडतोब मुंबईच्या केईएम हॉस्पिटलला हलवले. सर्व टेस्ट करून घेतल्यानंतर समजले की माधुरीच्या एका किडणीला सूज आली आहे, आणि दुसरी किडणी पूर्णपणे निकामी झाली आहे. रमेशने डॉक्टरांना सांगितले, झाले, तरी माधुरीला निरोगी आयुष्य जगता आले पाहिजे. डॉक्टरांनी रमेशच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला. काही सर्व टेस्ट्वे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी रमेशला विश्वासात घेत, सांगितले, रमेश, माधूरीच्या एका किडनीला पूर्णपणे डॅमेज आहे, दुसरी किडणीसुद्धा 50% निकामी झालेली आहे. त्यामुळे लवकर किडणीरोपन करावे लागेल. रमेश कितीही खर्च आला, तरी करायला तयार होता. फक्त माधुरीला मॅच होणारी किडणी मिळणे गरजेचे होते. माधुरीचा रक्तगट 0- असल्यामुळे किडणी मिळणे अवघड झाले होते. रमेशने ओळखीच्या सर्व ठिकाणी प्रयत्न केले. सर्व डॉक्टरांना, हॉस्पिटलमध्ये सांगितले किडनी मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही मा माधुरीला मॅच होणारी किडनी कुठेही मिळत नव्हती धूरी च्या नातेवाइकांपैकी कुणीही रिस्क घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे सगळीकडूनच इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती. लवकरात सगळीकडे चौकशी करून झाली. माधुरीच्या माहेरच्यांनीही प्रयत्नांची शिकस्त केली. पण किडणी मिळाली नाही. माधुरीला दिवसें- दिवस खूप त्रास होवू लागला. डॉक्टरांनी 'जर किडनी मिळाली नाही. तर माधुरी पुढच्या सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस जगू नाही असे घोषित केले. माधुरीने रमेशला धीर देत त्याचा हात हातात घेत सांगितले, शकनार

"रमेश, माझं उरलेलं आयुष्य आपण हॉस्पिटलमध्ये चकरा मारण्यात आणि त्या खराब औषधांच्या, केमिकल्सच्या वासात घालवण्यापेक्षा हे क्षण आपण आनंद घेत जगूया" रमेश तिच्या बोलण्यावर विचार करत म्हणाला. " माधुरी, यावर काही तरी पर्याय असेल गं, काही तरी मार्ग नक्की निघेल. माझं मन मला सांगतंय." माधुरीला रमेशच्या या भाबड्या विश्वासाची कीव येत होती. पण तिला तिचं मरण समोर दिसत तिला माहित होतं, तिने धीर सोडला, तर रमेश जिवंतपणी मायला जाईल. त्यामुळे ती स्वतःला अधिकाधिक आनंदी आणि व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करू लागली.

  दुसऱ्या दिवशी सकाळीच रमेश माधुरीचा हात धरून आनंदाने ओरडू लागला. माधुरीला समजेना, नेमकी काय झालंय! त्यानंतर रमेशने तिला सांगितले की किडनी मिळाली, आणि माधुरीचे किडणी रोपनाचे ऑपरेशन आपण करू शकतो. माधुरीलाही खूप आनंद झाला. रमेशने डॉक्टरांना सांगून लगेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

माधुरीचे ऑपरेशन यशस्वी झाले. ती आता केवळ 6 महिने नव्हे, तर कितीतरी वर्षे जिवंत राहू शकते, इतर मुलींप्रमाणे एक निरोगी जिवन जगू शकते असे डॉक्टरांनी जाहीर केले. रमेशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनपेक्षित पणे सर्व घडल्यामुळे सगळ्यांनाचा आनंद झाला होता. माधुरीला तिला किडणी देणाऱ्या व्यक्तीचे नाव जाणून घेण्याची इच्छा होती. डॉक्टरांनी तिला सांगण्यास नकार दिला. पण रमेशला मात्र तिने विश्वासात घेवून विचारले, आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. माधुरीला जीवनदान देणारा आणि स्वतः एका किडणीवर जगणा दुसरा तिसरा कुणी नसुन रमेशच होता!

Comments

Post a Comment