पोपट मेला - ज्योती राणा
एके दिवशी, एका खूप मोठ्या कंपनीच्या CEO, मैडम ने एक पोपट विकत आणून ऑफिसमध्ये ठेवले, त्याचा पिंजरा सुद्धा खूप सुंदर होता, दुकानदार म्हणाला होता की हा पोपट खूप छान बोलतो, पण मॅडमने ऑफिसमध्ये जेव्हा पोपटाला ठेवले तेव्हा, तो दिवसभरात एक शब्दही बोलला नाही,
मॅडम पोपटाला घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा दुकानदारा जवळ गेल्या आणि दुकानाला सांगितले की तो अजिबात बोलत नाही, आणि तू म्हणाला होतास की तो खूप बोलतो.
त्यावर दुकानदार म्हणाला, मॅडम, त्याच्यासाठी आरसा विकत घेऊन या आणि पिंजऱ्यात ठेवा, तो आरशात पाहिल्यावर बोलायला लागेल, असं म्हणून मॅडमने आरसा घेतला, आणि त्यांनी तो आरसा पोपटाच्या पिंजऱ्यात ठेवला, तरीही तो दिवसभर बोलला नाही, मॅडम पुन्हा दुकानात गेल्या, म्हणाल्या अजूनही पोपट काही बोलत नाही,
त्यावर दुकानदार म्हणाला, मॅडम, एक सरळ शिडी विकत घ्या जर पोपट त्यावर चढला तर तो बोलेल,
मॅडमने शिडी विकत घेतली आणि पिंजऱ्यात ठेवली.
दुसर्या दिवशी त्या परत दुकानात गेल्या आणि म्हणाल्या - पोपट अजूनही बोलत नाही, तुम्ही तो तुमच्याकडेच ठेवा, मला हा पोपट नको,
तेव्हा दुकानदार म्हणाला, मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याच्यासाठी एक झुला विकत घ्या. त्यावर पोपट झुलेल आणि मग तो बोलेल,
मॅडमने शेवटची संधी देत एक झुला विकत घेतला आणि पिंजऱ्यात ठेवला आणि तरीही पोपट काहीच बोलला नाही, असे 2 - 3 दिवस गेले आणि तो पोपट मेला, मॅडम त्या पोपटाला घेऊन दुकानदाराकडे गेल्या आणि म्हणाल्या हा पोपट तर मेला आता मी काय करू, तुमच्या सांगण्यावरून मी इतक्या गोष्टी त्याला दिल्या तरी तो मेला, आता मी काय करू,
त्यावर दुकानदाराने मॅडमला विचारले, मॅडम, पोपट मारण्यापूर्वी तुमच्याशी काही बोलला का,
मॅडम म्हणाल्या, हो, तो कमी शब्दात काहीतरी बोलला होता.
दुकानदाराने विचारले, काय म्हणाला होता तो पोपट?
मॅडम म्हणाल्या, पोपट मला म्हणाला की तू या सगळ्या गोष्टी आणू शकतेस, पण येताना माझ्यासाठी काही खायला घेऊन आली नाहीस, तू मला सगळं दिलंस, पण खायला दिलं नाहीस, मी भुकेने मरत आहे.
असं तो बोलला आणि तो पोपट मेला.
- ज्योती राणा



Comments
Post a Comment