तो दिवस ती रात्र - अमन कुमार (To diwas to ratra by Aman kumar)
त्या दिवशी नीताचे आई वडील गावाकडे गेले होते आणि नीता घरी एकटीच होती. राजेशला घरात घेताच त्याने नीताला मिठी मारली.
"आज आपण पुन्हा एक होणार."
असं म्हणत नीताने तिचे ओठ राजेशच्या ओठांवर टेकवले. तो स्पर्श होताच एक वेगळीच वीज राजेशच्या शरीरात दवडली. त्याने तीव्रतेने त्याच्या ओठांची पकड मजबूत केली. डाव्या हाताने त्याने नीताचे नितं*ब स्वतःच्या दिशेने ओढले आणि उजवा हात तिच्या पाठीवर फिरवू लागला. ओठांची पकड सैल होताच नीता म्हणाली. -
"आपल्याला निघायला हवं." आणि ती मागे सरकली.
"मला राहावत नाही आता." - राजेश नीता च्या जवळ जात म्हणाला.
"आपण एकदा का गुजरातला पोचलो की मग तू मनसोक्त कर. पण आता आपल्याला घाई करायला हवी."
"हो, आता चार वाजलेत. मी घरी जाऊन परत आठ वाजेपर्यंत येतो."
एवढं बोलून राजेश तिथून निघून गेला.
राजेश आणि नीता यांनी घरच्यांच्या सांगण्यावरून एका वर्षापुर्वी घटस्फोट घेतला होता. परंतु एक आठवड्यापूर्वी दोघं पुन्हा भेटले आणि त्यांच्या मनातला एकमेकांबद्दलचा असणारा राग पुर्णपणे गेला. त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचे ठरवले. त्यानी हि गोष्ट आपापल्या घरी सांगितली. मात्र घरच्यांनी पुन्हा लग्न करण्यास साफ नकार दर्शविला. काय करावे हे त्या दोघांना समजत नव्हते. एकमेकांना सोडून राहणं आता शक्य नव्हते. म्हणून त्यांनी पळून जाऊन पुन्हा लग्न करायचे ठरवले. त्याच प्लॅनला पुर्ण करण्यासाठी राजेश घरी गेला, त्याने त्याच्या सामानाची बॅग भरली आणि घरच्यांना सांगितले की तो ऑफिसच्या कामाने दोन दिवसांसाठी बाहेरगावी जाणार आहे.
तो घरातून निघाला आणि सरळ नीताच्या घरी पोहोचला. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. नीताने तिची कपडे आणि इतर सामानाने भरलेली बॅग राजेशच्या कारच्या डिकीत टाकली आणि ती पुढच्या सीटवर जाऊन बसली. राजेशने गाडी सुरू केली आणि ते दोघं गुजरातच्या दिशेने निघाले.
यापुढे ते दोघं एकत्र राहणार, या विचाराने राजेश इतका आनंदी होता की तो गेल्या दोन रात्रीत बिलकुल झोपला नव्हता. रात्रीच्या दहाच्या सुमारास राजेशच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली. ते नीताने पाहिले. राजेशच्या खांद्यावर हात ठेवत नीता म्हणली -
" राजेश, तुला झोप येत आहे का?"
"हो... दोन रात्रींच जागरण आता त्रास देऊ लागलं आहे."
"तू थोडा झोपुन घे. तो पर्यंत मी गाडी चालवते."
राजेशने गाडी थांबवली. नीता गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर सीटच्या जवळ आली. राजेश खाली उतरला आणि नीता समोर जाऊन उभा राहिला.
"काय झालं? पलीकडून येऊन बस."
राजेशने नीताला मिठी मारली.
"काय करतोयस राजेश?" नीताने हसत विचारले.
राजेशने नीताचा चुं*बन घ्यायला सुरुवात केली. नीतानेही विरोध दाखवला नाही. राजेशचा हात नीताच्या टॉपच्या आत गेला. नीताच्या अन्तर्व*स्त्रावरुन तो हात फिरवू लागला. चुंब*नाच्या नादात ते दोघं कधी कारच्या सीटवर झोपले त्यांना कळाले नाही. एका हाताने राजेशने नीताचा टॉप काढला.
"राजेश! आपण रस्त्यावर आहोत." - नीता काढलेल्या टॉपने छाती झाकत म्हणाली. राजेशने टॉप बाजूला काढत डावा स्त*न हातात धरला आणि उजव्या स्त*नावर तो चुंबन घेऊ लागला.
"बस झालं आता." असं म्हणत नीताने राजेशला दूर ढकलले आणि तीने टॉप घातला. अर्धसंतुष्ट राजेश शेजारच्या सीटवर जाऊन बसला.
आता निता गाडी चालवू लागली. काही अंतरावर गेल्यानंतर तिने पाहिले की राजेशला गाढ झोपेत लागली होती.
अचानक राजेश किंचाळत उठला. निताने त्याच्या कडे पाहिले. तो घामाघूम झाला होता. त्याने कारमधला आरसा त्याच्या दिशेने वळवला आणि स्वतःचा चेहरा त्यात पाहिला.
"काय झालं तुला?"
राजेश कडं पाहत निताने विचारले. राजेश काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने पाहिले की कार वेगाने धावत होती आणि निता त्याच्याकडे पाहत होती. तिचं रस्त्याकडे बिलकुल लक्ष नव्हते. राजेशने रस्त्याच्या दिशेने पाहिले तर त्याला कळाले, कार अश्या एका वळणाच्या दिशेने धावत आहे की त्या वळणाच्या पलिकडे दरी आहे. तो काही बोलणार आणि निता ते दृश्य पाहणार त्या आधी कार रस्त्याचे कडे तोडून सरळ दरीत कोसळली. कार एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली. राजेशने सीटबेल्ट लावलेले नव्हते, म्हणून तो त्या झटक्याने कारची काच फोडून बाहेर सरळ दरीत जाऊन पडला.
त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा सर्व काही शांत झाले होते. अजूनही आजुबाजुला अंधारच होता. त्याने वरच्या दिशेने पाहिले तर त्याला झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेली कार दिसली. त्याने तिथेच शेजारी निताला शोधले. परंतु बरंच शोधल्यावर सुध्दा त्याला निता सापडली नाही. त्याने शहरात जाऊन मदत आणायचे ठरवले. तो कसाबसा झाडाझुडुपांमधून वाट शोधत वर रस्त्यावर आला. तो काही वेळासाठी रस्त्याशेजारच्या दगडावर बसला आणि नंतर त्याने शहराच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
काही अंतरावर गेल्यानंतर त्याला लांबून येणारी कार दिसली. राजेशने कारला थांबवण्यासाठी हात पुढे केला. कारवाल्या सुध्दा गाडी थांबवली. मात्र राजेश कडे पाहून तो किंचाळला आणि घाबरलेल्या चेहऱ्याने तो तिथून निघून गेला. 'त्याने असे का केले असेल?' असा प्रश्न राजेशच्या मनात आला. परंतु यांच्याकडे जास्त लक्ष न देता तो पुन्हा शहराच्या दिशेने चालू लागला. काही तासांनी तो त्याच्या घरी पोहोचला. त्याचं घर जवळ असल्यामुळे तो आधी स्वतःच्या घरी गेला. त्याने पाहिले की घराची लाईट अजूनही चालूच होती. याचा असा अर्थ होता की घरातले अजूनही जागे होते. त्याने दारावरची बेल वाजली. काही क्षणातच दार राजेशच्या आईने उघडले. त्याच्या आईने राजेशला पाहिले आणि त्या जोरजोरात ओरडू लागल्या. त्यांचं ओरडणं ऐकून राजेशचे वडील दाराजवळ आले. ते सुद्धा राजेशला पाहून जोरात ओरडले. राजेश काही बोलणार त्या आधी त्याच्या वडिलांनी दार बंद केले. 'कदाचित मी निता सोबत पळून जाणार आहे हे त्यांना कळालं असेल. म्हणून त्यांनी मला घरात घेतलं नाही. पण मग ते ओरडले का?' - राजेश घरासमोर उभा राहून स्वतःशीच पुटपुटत होता. बराच वेळ आई वडीलांच्या नावाने हाका मारुन आणि दारावरची बेल वाजवून सुध्दा कोणीच दार न उघडल्याने तो निराश होऊन निताच्या घराच्या दिशेने जाऊ लागला. निताचे आई वडील रात्री पर्यंत परत येणार होते. त्यांना भेटून झालेल्या अपघाताची माहिती द्यायची होती.काही तासांनी तो नित्याच्या घरी पोहोचला. त्याने बेल वाजली तर आतून निताने दार उघडले.
"निता तू इथं?"
निता राजेशकडे पाहून थोडीशी थांबली. तिचे डोळे विस्फारले.
"अरे मी तुला विचारतोय, काहीतरी बोल." - राजेश ओरडला.
"मी इथंच राहते... पण तू...?"
राजेशने घराच्या भिंतीकडे पाहिले आणि विचारले -
"घराला रंग कधी दिला?"
"दोन महिन्यांपूर्वीच दिलाय... वडिलांनी दिला." - ती दबक्या आवाजात म्हणाली.
"दोन महिन्यांपूर्वी? कसं शक्य आहे? आपण निघालो होतो तेव्हा नव्हता कलर."
" हो. त्या अपघातानंतर चार महिन्यांनी वडिलांनी घराला रंग दिला."
"काय बोलतीयेस तू... काही तासांपुर्वीच तर अपघात झालाय ना?"
"राजेश, आपल्या अपघाताला सहा महिने होऊन गेलेत."
"निता, तू असं माझ्याशी खोटं का बोलतीयेस मला काहीच समजत नाही." - राजेश चिडून म्हणाला.
त्याने रागात त्याच्या डाव्या बाजूला पाहिले. डाव्या बाजूच्या भिंतीवर मोठा आरसा अडकवलेला होता. आरश्यात त्याने स्वतःचा चेहरा पाहिला. त्याचा चेहरा सडलेल्या शवासारखा दिसत होता. जणू सहा महिन्यांपासून त्याचं शरीर त्याच दरीत सडत होतं. राजेशने त्याचा तो विदृप शरीर पाहिले आणि तो जोरात किंचाळला. त्याने डोळे बंद केले आणि जेव्हा उघडले तेव्हा तो कारमध्ये होता. तो किंचाळतच उठला होता. निता कार चालवत होती. राजेशने कारमधल्या आरश्याला स्वतःच्या दिशेने फिरवला. त्याचा चेहरा आधीसारखाच दिसत होता.
"काय झालं तुला?"
राजेशकडं पाहत निताने विचारले. राजेश काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने पाहिले की कार वेगाने धावत होती आणि निता त्याच्याकडे पाहत होती. तिचं रस्त्याकडे बिलकुल लक्ष नव्हते. राजेशने रस्त्याच्या दिशेने पाहिले तर त्याला कळाले, कार अश्या एका वळणाच्या दिशेने धावत आहे की त्या वळणाच्या पलिकडे दरी आहे. तो काही बोलणार आणि निता ते दृश्य पाहणार त्या आधी कार रस्त्याचे कडे तोडून सरळ दरीत कोसळली. कार एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली. निताने सीटबेल्ट लावल्यामुळे ती कारमध्येच राहिली. मात्र राजेश कारची काच फोडून बाहेर पडला.
- अमन कुमार
Marathi psychothriller story, Marathi psychological story, author Aman kumar

Post a Comment
0 Comments