एकच चूक - सौ.वैशाली सुनील मुन Ekach chuk by Mrs Vaishali Moon
शेवंता सकाळी सकाळी उठून गावात जायला निघाली. तितक्यात शंकर ओरडला, कुठे चालली ही अवदसा,
इकडे पोर तापाने फणफणत आहे. आणी हि चालली. पाटलांच्या घराकडे मौजमजा करायला. तिने कानडोळे करत घरातून सपासपा पावले टाकत घराच्या बाहेर पडली. तीला काय करावे काहीच सुचतच नव्हते. आपल्या पोटच्या गोळयाला तापाच्या अवस्थेत सोडून जाणे तीला योग्य वाटत नव्हतं. पण काय करणार आई होती. कसं ही करून आपल्या बाळाला दवाखान्यात न्यायचे होते. आईला कुठे असतो अधिकार थकायचा आणि ती जगत पण असते आपल्या लेकांसाठी आणि आपल्या संसारासाठी ती आपल्याच विचारात जात असतांना, गोदाने आवाज दिला, ए शेवंता कुठे चालली ये,
काय वे काय झालं म्या चालली पाटलांच्या वाड्यावर थोडे काम आहे. पाटलीण बाईकडे असे म्हणून ती निघाली. शेवंता वाड्यात जाताच दारातच पाऊल टाकताच तीचे लक्ष पाटलाकडे गेले. ती एकदम शांत झाली. असे तीला वाटले हे काय झालं आहे, पाटील तिच्याकडे बघतच होता.
तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. वाटल तीला त्याचाकडे बघतच राहावे. किती दिवसांनी नजरेस नजर भिडली होती. तिने हळूच पदर जवळ घेतला आणि मान फिरवून डोळे पुसले. आज मनात तिच्या दाटुन आले होते.
पाटलाने विचारले बरी आहे ना शेवंता,
तिने मान हलवली, आणी तितक्याच एक माणूस आला आणि पाटिल निघून गेला.
शेवंता आत गेली पाटलीण बाई बैठकीत पलंगावर बसली होती. सगळे घर गजबजलेले होते. बायाची ये जा सुरू होती.
शेवंताला प्रश्र पडला, पाटलीण बाईला कसे सांगु की माझा लेक आजारी आहे. आणी घरांत धान्याचा एक कण बी नाही आहे.
तर थोडे उसणे पैसे दया म्हणुन, सगळया बाया पाटणीला सजवण्यात लागल्या होता. आज पाटलीण बाईचे डोहाळे जेवण होते. सगळीकडे खुशीचे वातावरण होते.
शेवंता बरेच वेळ उभी होती. तेव्हा तिथली एक बाई बोलली,
ऐ शेवंते जरा बाजूला उभी हो की, किती येळ झालीया, मध्येच उभी आहे. तर शेवंताचे डोळे भरून आले.
किती बदनशीबी होतो आपण या सुखाला लाथ मारून त्या शंकरचा प्रेमासाठी घर सोडून गेलो.
नाही तर आज या घरांची मालकीण असतो. सारे सुख पदरात असताना आपण हे काय करून बसलो याची खंत तीला क्षणभर वाटली. तेवढ्यात गोदाने आवाज दिला कसल्या तंद्रीत आहे ग शेवंता किती वेळ झाला आवाज देतयं लक्षच नाही आहे.
नाही ग बाई मी कसल्या तंद्रीत राहणार अगं माझ्या मुलाची तब्येत खूप खराब आहे ग
राञभर तापाने फणफणत होता गं,राञभर डोळया नाही लागला या विचाराने कवा पहाट होते. कवा वाड्यावर जातो. आणी पाटलीण बाईले मदत मागतो. म्हणूनच पहाटेच आली बघ इथे आली तर कार्यक्रम सुरु आहे. तर पाटलीण बाईला कसे विचारु समजतच नाही बघ...
गोदा बोलली, अवं माय माझे,
विचार की, ती भी माय होणार आहे ती समजून घेईल व्यथा अशी बोलताच शेवंता हो बोलली,
शेवंता अंगात बळ आणून कार्यक्रमाचा मध्ये घुसली आणि आपली परिस्थिती सांगू लागली.
पण पाटलीण बाईचे तीच्या गोष्टीकडे लक्षच नव्हत. म्हणुन तीला काहीच कळतच नव्हते. काय करावे, आणी आपली परिस्थिती कुणाला सांगावे. पोराचा चेहरा डोळ्यांपुढे येत होता. असे ही दिवस येतील हि जाणिव नव्हती.ती पाटलीण बाईचा वाड्यातून धावत एका मंदीरात शिरली.आणी देवाला विनवणी करू लागली. तीला समद आठवू लागले.
आपल्या हातुन घडलेल्या घटनेची ती एकटीच साक्ष होती, आणी होता तो परमेश्वर ती मंदीरातच शांत बसली. शरीरापेक्षा मनाने ती फार थकली होती. आज तीला वाटले होते कसले हे जीवन, आपले ठिक आहे पण पोराचे हाल पाहवतं नाही. आणी ती आतून पोखरुन निघत होती. तीला आठवत होते. एक एक क्षण, जेव्हा पाटिल तीला घरच्या सोबतं पाहायला आला होता. दोघेही एकाच गावचे होते.शेवंता जेम तेम सोळा वर्षाची होती दिसायला खूप सुंदर गोरी भरारी,कुणाला आवडावी अशीच, सडपातळ बांधा, नक्षदीर डोळे, चाफेदार नाक पण गरीब घरची तिच्या या दिसण्यापायी तीला गावातील तरूण बिघडलेल्या मुलांकडून खूप ञास सहन करावे लागत असे. म्हणुनच, तिच्या आई बापानं जेम तेम चौथी पर्यतच शिक्षण घेऊ देऊन पुढचे शिक्षण घेऊ दिले नाही. अशातचं तीला पाटलाकडून मागणी आली.
शेवंता एक एक गोष्टीचा विचार करत बसली. जीवनाच चक्र कसे फिरते ते कळतचं नाही बघ असे स्वतःलाच प्रश्र केला. ज्या माणसाला गरीब म्हणून सोडला तोच आता धनवान आहे. आणी जो शंकर धनवान होता.तर आता गरीब हाय...
मग तीला आठवले कि पाटिल हा सामान्य घरचाच होता. पण शिकून होता. दहावी पास आणि नोकरी करणार होता. पण गरिब घरचा म्हणुन दोन एकर शेती आपल्या वडोपाजित सांभाळत होता. कवा कवा तो शंकरचा शेतात कामाला बी जात असे
आणि जेव्हा शेवंताशी लगीन झाले होते. त्यांचा छान संसार सुखी होता. पाटिलच नाव राम होते. खूप छान स्वभाव होता. त्याचा कुणाला पण मदत करणारा गरीब होता. तरी फक्त एक वडोपाजित एक वाडा होता. बाकी अठराविश्वेद्रारिदय होते.
अचानक एक दिवस राम शेतातून आला. आणी त्याला खूप ताप आला. आणी तो ताप उतरतच नव्हता. खूप इलाज केला पण अशातच शेवंताला शंकर च्या शेतात काम करण्याची पाळी आली .आणी शेवंता शंकरचा प्रेमात पडली. तीला शंकर आवडू लागला. ती हे हि विसरली. की आपला नवरा बिमार हयाय..
शेवंता विचार करत बसली मंदिरात आणि ती एक चूक ने कसे जीवन उध्वस्त झाले हे विचार करू लागली. अशीच विचार करत असतांना तीला आपल्या लेकांचा चेहरा आठवला, दोन तीन दिवस झाले.
पोर तापाने फणफणत आहे. आणी शंकरला तर त्याचे काहीच नाही. त्याला फक्त हवं असते. बाटली या याचा शौक पायी समंद गेले. पण हयो काही सुधरत नाही.
कोण्या म्हसनी यांचा प्रेमात पडली आणि, आपल्या चांगल्या संसाराची राख रांगोळी केली. पाटलाला तापाचा अवस्थेत सोडून गेली. म्हणून देवाने माझ्यावर हि पाळी आली. अशी मनातच पुटपुटली. आणी डोळयांत अश्रु जमा झाले.तीला प्रश्र पडला घरला कसे जावू पोराला कुठले जेवू नेवू काय करू काहीच सुचतच नाही.
शेवंताचा मनात आलं, संपवून टाकावे स्वतःला निदान पुढची परिस्थिती आपल्या पाहावे लागणार नाही. ती धावतच नदीकाठी गेली. तीथे जाऊन उभी राहिली. पोराचा चेहरा दिसू लागला.
शेवंता रडु लागली, इतक्यात कुणी तरी खादयांवर हात ठेवला. ती मागे वळून बघितले. तर पाटिल होते.
शेवंता, तुम्ही इथे कसे वं
अगं तु पाटलीण बाईशी जे बोलतं होती. तेव्हा मी जवळच उभा होतो. तुझ समद ऐकलं,
अगं येडी झालीस का शेवंता तु इतकी हळवी कवा पासून झालीस गं...
मला सोडून जातांना जरा बी विचार नाही आला का गं माझा...
किती जीव होता तुझ्यावर...
सारे सुख पदरात आणून टाकले असते मी....
थोडा वेळ तर मला दिला असता पण तु मला त्या परिस्थितीत सोडुन गेलीस. माझा काय गुन्हा होता गं..
बोल शेवंता,
काहीच नाही वं धनी माझीच चूक होती वं त्याचेच पाप फेडत आहो वो...
पण आपल्या लेकाला वाचवा व
आपला लेक हो जी,
तुमचाच लेक आहे तो मी जेव्हा घर सोडले तेव्हा पोटुशी होती. चौथ्या महिना सुरू होता....
मला क्षमा करावं,.. असे म्हणत शेवंता रडू लागली. पाटलाने तीला
आपल्या जवळ घेतलं आणि म्हटल शेवंता तुझी एक चुकचं लयी भारी होती...
लेखिका. सौ.वैशाली सुनील मुन (श्रीसाई) चंद्रपुर

Post a Comment
0 Comments