तो बघतोय आम्हाला - अमन कुमार psychothriller real story

 (ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे.)

जून 2014 मध्ये, मारिया आणि डेरेक ब्रॉडस त्यांच्या तीन मुलांसह वेस्टफिल्ड, न्यू जर्सी येथील 657 बुलेव्हार्डमध्ये नवीन घर घेतले होते. 657 बुलेवर्ड हे मारियाच्या बालपणीच्या घराच्या जवळ असल्यामुळे आणि प्रशस्त मांडणी असल्यामुळे ब्रॉडड्यूसने ते घर घेतले होते.



 विकत घेतल्यानंतर तीन दिवसांनी, त्यांच्या मेलबॉक्समध्ये एक पत्र आले, ज्यामध्ये "द न्यू ओनर(नवीन रहिवाशी)" यांना उद्देशून हे पत्र आले होते. टाईप केलेल्या त्या पत्रात असे लिहिले आहे, - "657 बुलेवर्डच्या प्रिय नवीन शेजारी, मला आमच्या शेजारच्या परिसरात तुमचे स्वागत आहे. तुम्ही येथे कसे पोहोचलात? 657 बुलेवर्ड या घराने तुम्हाला बोलावले का? 

657 बुलेवर्ड हा माझ्या कुटुंबाचा खूप महत्त्वाचा विषय आहे. या घराचा 110 वा वाढदिवस जवळ आला आहे, माझ्या आजोबांनी 1920 च्या दशकात आणि माझ्या वडिलांनी 1960 च्या दशकात या घराकडे पाहण्याची  जबाबदारी दिली आहे.


मी कोण आहे?... या शहरातल्या शेकडो कार आहेत, ज्या दररोज 657 बुलेव्हार्ड या घरा समोरून जातात. कदाचित त्यापैकी एक कार माझी आहे. 657 बुलेवर्ड या घरा समोरून अनेक पायी चालत जनाऱ्यांपैकी मी एक असू शकतो, तुम्ही मला खिडकीतून पाहू शकता. 657 बुलेवर्डमधील खिडक्यांपैकी कोणत्याही खिडकितून बाहेर पहा. कदाचित मी तुम्हाला दिसेन...तुला मुलं आहेत. मी त्यांना पाहिले. मी मोजले, मला वाटतंय ते तीन आहेत... माझी एक विनंती आहे, घराला एका नवीन बाळाची गरज आहे, तुम्ही घराचं मदत करू शकता का? वाढत्या कुटुंबासाठी तुमचे जुने घर लहान होते का? तुम्हाला तुमच्या मुलांना नवीन घरात आणण्याचा लोभ होता का? एकदा मला त्यांची नावे कळली की मी त्यांना नावाने संबोधित करीन." 

पत्राच्या शेवटी लेखकाने "द वॉचर" अशी स्वाक्षरी केली. पत्र मिळाल्यानंतर, ब्रॉडडस कुटुंबाने घराच्या पूर्वीच्या मालकांशी, (म्हणजे जॉन आणि अँड्रिया वुड्स नावाच्या जोडप्याशी) संपर्क साधला. वूड्स कुटुंबाने ब्रॉडडस कुटुंबाला सांगितले की ते 657 बुलेव्हार्ड येथे राहिलेल्या तेवीस वर्षांमध्ये त्यांना "द वॉचर" कडून फक्त एक पत्र मिळाला होता, परंतु वुड्स यांनी फारशी काळजी न करता ते पत्र फेकून दिले.

वुड्स फॅमिलीशी बोलल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी पोलिसांकडे जाऊन घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांना त्या 'वॉचर'बद्दल शांत राहण्याची सूचना केली आणि त्यांच्या शेजाऱ्यांची चौकशी सुरु झाली. दोन आठवड्यांनंतर, ब्रॉडड्यूस यांना दुसरे पत्र मिळाले. पत्रात त्यांचे आडनाव, मुलांचा जन्म क्रम आणि मुलांची टोपणनावे यासारख्या माहितीचा समावेश होता. तसेच त्याने पत्रात लिहिले -"ती कुटुंबातील कलाकार आहे का?" असे विचारून त्यांच्या मुलीला पोर्चच्या जागेत पेंटिंग करताना पाहिल्याचा संदर्भही त्यात दिला. 

पत्रात पुढे तो म्हणाला "या घराच्या भंतींमध्ये आणि घराच्या फराशांच्या खाली असलेली सर्व रहस्ये तुम्हाला सापडली आहेत का? एक बाळ तळघरात खेळताना तुम्हाला दिसले का? ते खूप घाबरल्यावर ते ओरडते. मी जर तिथे असतो तर मी खुप घाबरलो असतो. तुम्ही घबरल्यावर दुसऱ्या मजल्यावर झोपतात का?"

 हे पत्र मिळाल्यानंतर, मारिया आणि डेरेक यांनी त्यांच्या मुलांना घरी आणणे बंद केले. त्यांनी त्यांच्या मुलांना मरियाच्या आईच्या घरीच ठेवले आणि पुढे काही आठवडे ते या नवीन घराकडे फिरकलेच नाही.

  त्यांच्या घरी जाण्याच्या योजना थांबवल्या, "तुम्ही कुठे गेला आहात? 657 बुलेव्हर्ड तुमची आठवण काढत आहे" असे तिसरे पत्र लिहिले.

वर्षभर तपास करूनही अद्याप कोणताही पुरावा मिळाले नाही. या गोष्टीमुळे ब्रॉडडस कुटुंब तणावात आले. शेवटचा पत्र मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी ब्रॉडड्यूसने घर विकण्याचा निर्णय घेतला, परंतु त्या परिसरात पसरलेल्या अफवांमुळे ते शक्य झाले नाही.

ब्रॉडड्यूसने त्यांना मिळालेले धमकीचे पत्र उघड न केल्याबद्दल वुड्स कुटुंबावर खटला टाकण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांनी हे पत्र हेतुपुरस्सर लपविल्याचा कोणताही पुरावा नसल्यामुळे किंवा ती खरी धमकी होती यावर विश्वास नसल्यामुळे कोर्टानी केस बरखास्त केले. 

 2016 म्हणजे पहिले पत्र मिळाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी, ब्रॉडड्यूसला एक कुटुंब त्यांच्याकडून घर भाड्याने घेण्यास इच्छुक असल्याचे कळले, या अटीवर की त्या 'द वॉचर' कडून पुन्हा पत्र आल्यास ते भाडेकरू घर सोडून जाऊ शकतात. ब्रॉडड्यूसने त्यांची अट मान्य केली आणि त्यांना ते घर भाड्यावर देण्यासाठी तयार झाले. मात्र दोन आठवड्यांच्या आत पुन्हा एक पत्र मिळाले " नीच आणि द्वेषपूर्ण डेरेक आणि त्याची पत्नी मारिया" यांना उद्देशून. पत्रात असेही लिहिले होते की "657 बुलेवर्ड तुमच्या हल्ल्यातून वाचला आणि त्याच्या समर्थकांच्या सैन्याने त्याचे दरवाजे अडवून मजबूत उभे राहिले... बुलेव्हार्डच्या माझ्या सैनिकांनी माझ्या आदेशाचे पालन केले. त्यांनी त्यांचे ध्येय पूर्ण केले आणि 657 बुलेवर्डच्या आत्म्याचे रक्षण केले. माझे त्या सर्वांना आदेश आहेत. कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू होऊ शकतो आणि हाडे तुटू शकतात.

 पत्राने भाडेकरूंना घाबरवले, परंतु तरी सुध्दा भडेकरूनी तिथे राहण्याचे ठरवले. फक्त अट एवढीच होती की घरमालकाने अधिक कॅमेरे घराच्या आजूबाजूला बसवावे.


त्या पत्रावर फिंगरप्रिंट नसल्यामुळे, किंवा इतर कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्यामुळे गुन्ह्याचा तपास करताना आणि एखाद्या संशयिताला गुन्ह्याच्या संदर्भात कोणतीही कारवाही करताना पोलिसांना कठीण जात होते, तेव्हा त्यांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले : 

पहिला होता "द गेमर" टोपणनावाचा असलेला एक माणूस, तो नेहमी मोबाईल वर गेम खेळत असल्याने त्याला हे नाव मिळाले होते. त्याच्यावर संशय गेला कारण तो "द वॉचर" नावाने हिंसक व्हिडिओ गेम खेळत होता,

दुसरा संशयित व्यक्ती म्हणजे त्यांचा शेजारी लांगफॉर्ड. तो नेहमी दुसऱ्यांच्या घरात डोकावताना त्याला बऱ्याच जणांनी बघितला होता. 

आणि तिसरा संशयित व्यक्ती म्हणजे स्वतः ब्रॉडस, ज्याने कुटुंबाला अक्षरशः "द वॉचर" या नावाने पत्र लिहिले. याचा संशय गेला 2016 च्या ऑक्टोबरमध्ये, ब्रॉडड्यूसेसने कोर्टाच्या कोणत्याही आदेशाला न जुमानता, द वॉचर नावाचा एक होरार चित्रपट बनवण्यास परवानगी दिली आणि त्या बदल्यात मोठी रक्कम घेतली. कोर्टात त्यांच्या विरुध्द कोर्टात केस केली मात्र लढाईनंतर, 2018 मध्ये, नेटफ्लिक्सने कथेचे अधिकार जिंकले.

जुलै 2019 मध्ये, 657 बुलेवर्ड अखेरीस अंदाजे $959,000 रकमेत विकले गेले, जे ब्रॉडड्यूसेसने विकत घेतलेल्या किंमतीपेक्षा सुमारे $400,000 कमी आहे. आतापर्यंत, नवीन मालकांना द वॉचरकडून एकही पत्र मिळाले नाही. मग या द वॉचर नावाने पत्र पाठवणारा नक्की कोण होता, हे अद्याप कळले नाही.

Post a Comment

0 Comments